शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
बरे झाले बा परीक्षा देण्याची गरज नाही : राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, आता लक्ष उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे, अकरावी परीक्षेसाठी ऐच्छिक सीईटी.
मुंबई दि. 31(प्रतिनिधी) : कोरोनाच्या संकटामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने आधीच घेतला होता. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुणांकन कसे करायचे याचे सूत्र निश्चित करण्यात आले असून याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी तीन दिवसा पूर्वी केली. मागच्या वर्षी नववीत मिळालेले गुण व यंदाच्या लेखी व तोंडी परीक्षेतील अंतर्गत गुणांवर दहावीचे गुण देऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. जूनअखेरपर्यंत निकाल जाहीर होणार असून अकरावीच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात सरकारकडून ही माहिती दिली जाणार असून न्यायालय काय निर्णय देणार यावर विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरणार आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाला विरोध करून काही लोकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानेही सरकारची खरडपट्टी काढून परीक्षा न घेता निकाल कसे जाहीर केले जाणार याबाबत स्पष्टता करण्याचे आदेश सरकारला दिले होते. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने या क्षेत्रातील तज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्यासोबत तब्बल 24 बैठका घेऊन धोरण निश्चित केले असून त्याची घोषणा ना. वर्षा गायकवाड यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली.
दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन करण्यात येणार असून त्यामध्ये या वर्षातील लेखी मूल्यमापनाला 30 गुण असतील. गृहपाठ, तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक या आधारावर 20 गुण दिले जातील तर नववीच्या अंतर्गत मूल्यमापनावर 50 गुण अवलंबून असतील. ज्या विद्यार्थ्यांना या पद्धतीने दिलेले गुण मान्य नसतील त्यांच्यासाठी कोविड नंतरच्या काळात परीक्षा घेतली जाईल, असे ना. गायकवाड यांनी सांगितले. गुणांकनाची प्रक्रिया पूर्ण करून जूनच्या अखेरीस दहावीचा निकाल लावण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
निकालाच्या नियमनासाठी 7 सदस्यीय समिती विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची निकाल समिती असेल. या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकार्यांकडून करण्यात येईल. शाळास्तरावर गैरप्रकार अथवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग व दंडात्मक कारवाई याची तरतूद करण्यात आली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
अकरावी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी !
दहावी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेचा व भवितव्याचा विचार करून हे धोरण निश्चित तयार करण्यात आले असल्याचे ना. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. विविध परीक्षा मंडळांनी या वर्षीच्या इयत्ता दहावी निकालासाठी शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन विचारात घेतल्याने अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील आणि त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
न्यायालयाकडे नजरा ! परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणार्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. हे धोरण न्यायालयाला सादर केल्यानंतर न्यायालय काय निर्णय देणार यावर विधार्थीयाचे भवितव्य ठरणार आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...