Home / महाराष्ट्र / केंद्र सरकारच्या नवीन...

महाराष्ट्र

केंद्र सरकारच्या नवीन योजना च्या धोरणाला पंजाब सरकारचा दुजोरा

 केंद्र सरकारच्या नवीन योजना च्या धोरणाला पंजाब सरकारचा दुजोरा

या योजनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार तरी केव्हा..?

मुंबई  :  देशातील इंधन वाचविण्यासाठी आणि साठवलेल्या इंधनामुळे होणाऱ्या दुर्घटनांपासून वाचविण्यासाठी केंद्र सरकारने  योजना सुरू केली आहे. याअंतर्गत आता लोक आपल्या घरातून किंवा कार्यालयात मोबाईलवरून डिझेल मागवू शकतात. पठाणकोट येथील चामुंडा ऑटोफिल ही योजना राबविणारा पंजाबमधील पहिला पेट्रोल पंप ठरला आहे. ग्राहकांपर्यंत डिझेल पोहोचवण्यासाठी एक खास मोबाइल बाऊझर डिस्पेंसर  वाहन (मिनी टँकर) तयार करण्यात आला आहे. याची क्षमता सहा हजार लिटर डिझेलची आहे. यामध्ये डिझेल घालण्याची मशीन सुद्धा आहे. चामुंडा ऑटोफिलचे मालक दिनेश गुप्ता यांनी सांगितले की, ही योजना पंजाब सरकारच्या कायदेशीर मेट्रोलॉजी विभागाने प्रमाणित केली आहे आणि टँकर पेट्रोलियम विस्फोटक सुरक्षा संघटनेद्वारे परवानाकृत आहे.याचबरोबर, इंडियन ऑईलच्या मोबाइल बाउजर डिस्पेंसर मुळे पंजाबमध्ये कोठेही डिझेलचा पुरवठा करता येईल.

प्रमाणानुसार आकारण्याची तरतूद आहे. आत्तापर्यंत कोणाकडूनही कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले गेले नाही. दर बुधवारी धारीवाल ते गुरदासपूर आणि पठाणकोटपर्यंत पुरवठा केला जाईल, असे दिनेश गुप्ता म्हणाले. याशिवाय, इतर जिल्ह्यांनाही वेगवेगळ्या दिवशी पुरवठा केला जाईल. सध्या पेट्रोल पंपच्या 9646661600 या नंबरवर ऑर्डर घेतली जात आहे. येत्या काही दिवसांत इंडियन ऑईल अॅप आणि टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात येईल. त्यावर सुद्धा ऑर्डर बुक होतील.यांना मिळणार फायदा!इंडियन ऑईलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की मोबाइल बाउजर डिस्पेंसर थेट डिझेल वाहनांमध्ये घातले जाणार नाही. शेतीची उपकरणे, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, कार्यालये, मॉल, सिनेमा, प्री-मिक्स प्लॉट्स व कारखाने, मोबाइल टॉवर्सपर्यंत आवश्यकतेनुसार डिझेल पोहोचले जाईल. पंजाबमधील अनेक वितरकांनी यामध्ये रस दर्शविला आहे. काही महिन्यांनंतर अशी वाहने जवळपास प्रत्येक जिल्ह्यात धावतील आणि कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय लोकांना घरबसल्या डिझेलचा पुरवठा करतील.स्टोअर डिझेलमुळे होणाऱ्या दुर्घटना टळतीलइंडियन ऑईलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, काही लोक कॅनमध्ये डिझेल साठवतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय, बरीच अवजड वाहने आहेत, ज्यांना पेट्रोल पंपावर जाण्यासाठी 4-5 किलोमीटरमध्ये अनेक लीटर डिझेल वापरावे लागते. आता असे लोक त्यांच्या कार्यालयात किंवा संस्थेत डिझेल मागवू शकतील.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...