शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर: कोरोना उपचारादरम्यान स्टेरॉईड च्या अतिवापरामुळे म्युकोरमायकॉसिस या आजाराचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर होत आहे. या बुरशीजन्य संसर्गाचे गंभीर परिणाम रूग्णांवर होत आहेत. राज्यभरात अशा रूग्णांच्या संख्येत मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे कोविड रूग्णांमध्ये हा दुर्मिळ संसर्ग आढळत आहे. चंद्रपूर जिल्हयात आजघडीला म्युकोरमायकॉसिसचे १२ रूग्ण आढळल्याची नोंद आहे. म्युकोरमायकॉसिस या आजारावरील उपचारासाठी आवश्यक उपकरणे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय चंद्रपूर येथे तातडीने उपलब्ध करण्याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली आहे.
म्युकोरमायकॉसिस या आजारावरील उपचारासाठी एमआरआय, सिटी विथ कॉन्ट्रास्ट, नेझल एन्डोस्कोप ही उपकरणे आवश्यक असून गोरगरीब रूग्णांना या आजारासंदर्भातील उपचार शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय चंद्रपूर येथे घेणे सोईचे व्हावे यादृष्टीने या उपकरणांची खरेदी तातडीने करण्याची आवश्यकता आहे. या उपकरणांसह सदर आजारावरील उपचारासाठी एमडी मेडीसीन तसेच नेफ्रोलॉजीस्ट तज्ञांची पदे मंजूर करून ही पदे भरण्याची आवश्यकता आहे. त्या माध्यमातुन या रूग्णालयात म्युकोरमायकॉसिस या आजारावर उपचार घेणे रूग्णांना सोईचे ठरेल, असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख व वैद्यकिय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता टास्क फोर्ससह अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका संभावण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. या संभाव्य संकटावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय चंद्रपूर येथे पेड्रीयाटीक व्हेटीलेटर व न्युओनेटल तसेच सीपीएपी मशीन ही उपकरणे सुध्दा अत्यावश्यक आहे. या उपकरणांच्या माध्यमातुन बालरूग्णांवर प्रभावी उपचार करता येणार असल्याने ही उपकरणे सुध्दा तातडीने या रूग्णालयासाठी उपलब्ध करावी असे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या प्रशासनाने याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे त्वरीत सादर करावे, अशा सुध्दा आ. मुनगंटीवार यांनी दिल्या आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...