आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राजुरा : राजुरा-पोवनी-कवठाळा मुख्य मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या मार्गावरून चालणे कठीण झाले आहे. यात सास्ती टी पॉईंट ते रामपूर बसस्टँड पर्यंत धुळीचे लोंढे उडत असल्याने रामपूर येथील नागरिकांचे जगणे कठीण झाले असून हा रस्ता अपघाताला आमंत्रण देत आहे. या मागणीला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राजुराच्या वतीने रामपूर येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पंधरा दिवसापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष स्वप्नील बाजुजवार यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले होते, मात्र बांधकाम विभागाने केवळ पांढरी गिट्टी टाकली असून त्यावर पानी मारले नसल्याने धुळीचे लोंढे उडत असून रामपूर परिसरातील नागरिकांच्या घरात धुळीचे थर साचत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
येथील जनतेला उद्भवत असलेल्या समस्या लक्षात घेता राजुरा-पोवनी-कवठाळा मार्गाचे काम तात्काळ सुरु करावे, रस्त्याचे बांधकाम होईपर्यंत सास्ती टी पॉईंट ते रामपूर बसस्टँड पर्यंतच्या रस्त्यावर सकाळ संध्याकाळ टँकरद्वारे पाणी मारावे, रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नाल्याचे काम तात्काळ सुरु करण्याच्या मागण्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजुराच्या वतीने एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले, यावेळी वेकोलीची ट्रकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याकडून आंदोलकांशी संपर्क साधून आठ दिवसात काम सुरु करण्याचे आश्वासन दिले असता आठ दिवसाच्या आत काम सुरु न झाल्यास यापेक्ष मोठे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष देरकर यांनी दिला आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...