Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना...

चंद्रपूर - जिल्हा

चंद्रपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना नझूलचे पट्टे वाटप करणार -पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना नझूलचे पट्टे वाटप करणार -पालकमंत्री विजय वडेट्टीवार

13 झोपडपट्टीचे नकाशे मंजूरीकरीता तात्काळ पाठविण्याचे निर्देश

चंद्रपूर, दि. 29 ऑगस्ट : चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात शासकीय जमिनीवर एकूण 14 झोपडपट्टया आहेत. यापैकी बाबानगर येथील झोपडपट्टीला नगर रचनाकार यांनी मान्यता दिली आहे. उर्वरीत 13 झोपडपट्टीचे नकाशे मंजूरीकरीता सहसंचालक नागपूर यांना तात्काळ पाठवावे. जेणेकरून शहरातील झोपडपट्टीवासियांना नझुलचे पट्टे वाटप करणे सोयीचे होईल व नागरिकांना दिलासा मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झोपडपट्टीधारकांच्या नझुल पट्टे वाटपासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन लोंढे, नगर रचनाकार आशिष मोरे आदी उपस्थित होते.

शहरातील झोपडपट्टीधारकांना नझूलपट्टे वाटपाबाबत नागपूरच्या धर्तीवर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वस्त करून पालकमंत्री म्हणाले, सर्व झोपडपट्ट्यांचा त्वरीत सर्व्हे करा. त्यांचे नकाशे मंजूरीकरीता नागपूर येथील सहसंचालक कार्यालयाला त्वरीत पाठवा.

शहरातील 14 झोपडपट्ट्यांमध्ये एकूण 4815 कुटुंबांचे वास्तव्य आहे. 17 नोव्हेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभ मिळण्यास पात्र असलेल्या कुटुंबांची संख्या 380 आहे.  झोपडपट्टी अभिन्यासामध्ये आवश्यक ती खुली जागा तसेच विकास नियंत्रण नियमावलीनुसार आवश्यक रुंदीचे रस्ते प्रस्तावित करण्यास मंजूरी प्रदान करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच शिथिलीकरण प्रस्तावात खुली जागा, रस्त्यांची रुंदी, त्यांचे मोजमाप, रस्त्याचे रुंदीकरण, प्रत्येक भुखंडास पोचमार्ग आदी त्रृट्यांची पुर्तता करून सुधारितरित्या प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देण्यात आले असून त्यानुसार नगर रचना कार्यालयाकडून कारवाई सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

पालकमंत्र्यांच्या हस्ते लसीकरण वाहनांचे उद्घाटन : महापारेषणच्या सीएसआर फंडातून जिल्ह्याला मिळालेल्या 30 लसीकरण वाहनांचे उद्घाटन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यासाठी उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रयत्नातून 30 लसीकरण गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात दोन गाड्या याप्रमाणे जिल्ह्यातील 15 तालुक्यांना या गाड्या देण्यात येतील. त्यामुळे निश्चितच लसीकरणाचा वेग वाढेल. विशेष म्हणजे गावागावातील जे नागरीक प्रवास करून लसीकरणाकरीता येऊ शकत नाही, त्यांच्यापर्यंत हे वाहन पोहचणार आहे. आरोग्य यंत्रणा मजबूत करणे व जास्तीत जास्त पात्र नागरिकांचे लसीकरण करणे, हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा संध्या गुरनुले, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत आदी उपस्थित होते.
 

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...