Home / महाराष्ट्र / राष्ट्रीय नवोपक्रमशील...

महाराष्ट्र

राष्ट्रीय नवोपक्रमशील शिक्षक पुरस्कार 2021 निलेश सपाटे यांना प्रदान करण्यात आला

राष्ट्रीय नवोपक्रमशील शिक्षक पुरस्कार 2021 निलेश सपाटे यांना प्रदान करण्यात आला

राष्ट्रीय नवोपक्रमशील शिक्षक पुरस्कार 2021 निलेश सपाटे यांना प्रदान करण्यात आला

राजु गोरे (प्रतिनिधी):    सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळा,  जि-पुणे येथे स्टेट इनोवेशन अँड रिसर्च फाउंडेशन ( सर फाउंडेशन) सोलापूर द्वारा आयोजित नॅशनल लेव्हल एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्स 2021 मध्ये जि प उच्च प्राथमिक शाळा, परमडोह पं स  वणी येथील उपक्रमशील शिक्षक श्री निलेश सपाटे गुरुजींना "वर्तमानपत्रातील आव्हानांची... जीवनाशी सांगड" या नवोपक्रमाची निवड करून त्यांना "राष्ट्रीय स्तर इनोव्हेशन अवॉर्ड 2021" थोर शास्त्रज्ञ मा. अरविंद नाथू सर, साखर आयुक्त महाराष्ट्र मा. शेखर गायकवाड साहेब(IAS), Ad. DGP महाराष्ट्र मा. अतुलचंद्र कुलकर्णी साहेब(IPS), माजी डायरेक्टर MSCERT मा.डॉ.शकुंतला काळे मॅडम, डेप्युटी डायरेक्टर MSCERT मा.विकास गरड साहेब, शिक्षणतज्ञ व लेखक मा. डॉ. ह. ना.जगताप सर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक मा.दत्तात्र  वारे गुरुजी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 

राष्ट्रीय स्तर इनोव्हेशन अवॉर्ड 2021 करीता  महाराष्ट्र, गुजरात, जम्मू काश्मीर, हरयाणा,कर्नाटक तसेच संपूर्ण भारताच्या विविध भागांतून 1200 शिक्षकांनी नवोपक्रम सादर केले त्यातील 103 सर्वात उत्कृष्ट नवोपक्रमाची निवड करून गौरविण्यात आले. यामध्ये जि प  शाळा परमडोह येथील श्री निलेश सपाटे गुरुजी यांच्या नवोपक्रमाची पण निवड करण्यात आली. 

श्री निलेश सपाटे गुरुजींनी मागील आठ वर्षात यवतमाळ जिल्हातील वणीमधील अगदी टोकावरील परमडोह गाव येथील  शाळेत अनेक गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवून जि प उच्च प्राथमिक शाळा, परमडोह येथील     विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविली आहे. श्री सपाटे गुरुजी मार्फत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढी सोबतच शारीरिक, मानसिक, सामाजिक विकासासाठी शाळा स्तरावर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. परमडोह येथील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना विमानातुन दिल्ली वारी घडविली आहे.

जि प शाळा, परमडोहची  शालेय गुणवंतामुळे  जिल्हात ओळख निर्माण झाली असून गावातील एकही विद्यार्थी खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात नसून अनेक बाहेर गावचे विद्यार्थी  परमडोह येथे शिक्षणाकरिता येऊन राहतात. यावरून येथील शिक्षकांची मेहनत दिसून येते.

श्री निलेश सपाटे गुरुजींना  मिळालेल्या पुरस्काराकरिता श्री प्रमोद सूर्यवंशी साहेब शिक्षणाधिकारी यवतमाळ,  मा.श्री गायनर साहेब गटविकासाधिकारी  वणी, मा. श्री देवतळे साहेब गटशिक्षणाधिकारी पं स वणी, मा. श्री मधुकर पाटील वाभीटकर सरपंच परमडोह,श्री संदीप थेरे, श्री सूर्यभान कोडापे अध्यक्ष शाळा समिती,केंद्र प्रमुख श्री विनोद उईके सर,  श्री हंसराज काटकर सर मुख्याध्यापक व पालक वर्ग यांचा द्वारे अभिनंदन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...