सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी) : शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत आबई फाट्यावरील दारूच्या दुकानासमोर शुल्लक वादातुन झालेल्या हाणामारीत एका २४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात रॉड घालून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या घटनेतील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील वेळाबाई येथे राहणारा गोलू उर्फ प्रतीक वडस्कर(३०) हा परिसरात अवैध दारूविक्रीचा धंदा करीत होता. सोबतच सोमेश्वर कावळे हा सुद्धा गोलू चा साथीदार होता. रविवार दि.१० ऑक्टोंबर ला सायंकाळी गोलू,सोमेश्वर,आकाश गोवारदीपे हे आपल्या मित्रांसह आबई फाट्यावरील वाईन बार मध्ये दारू पिण्यासाठी आले होते. काही कारणावरुन गोलू, सोमेश्वर व आकाश यांच्यात वाद झाला व वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. हाणामारी सुरू असतानाच गोलू वडस्कर व सोमेश्वर ने आकाश गोवारदीपे च्या डोक्यात रॉड हाणला. डोक्यावर वार वर्मी बसल्याने आकाश गंभीर जखमी झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आकाशला मित्रांनी त्याच्या घरी आणले. कुटुंबीयांनी आकाश ला उपचारासाठी चंद्रपूर येथे नेत असतांनाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच बार मधील सीसीटीव्ही फुटेज मुळे हत्ये चे रहस्य उलगडले शिरपूर पोलीसांनी लगेच गोलू व सोमेश्वर ला ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध ३०२, ३४ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोउनी/ गजानन कर्नाड करित आहे.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...