Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / आयटीआय वणी येथील मुनीर...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

आयटीआय वणी येथील मुनीर शेख यांनी ऊर्जा रूपांतर प्रक्रिया महासागरीय लाटांच्या ऊर्जेत रूपांतर, विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारा प्रकल्प तयार करणारा देशातील पहिला आयटीआय संधाता निदेशक ठरला.

आयटीआय वणी येथील मुनीर शेख यांनी ऊर्जा रूपांतर प्रक्रिया महासागरीय लाटांच्या ऊर्जेत रूपांतर, विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारा प्रकल्प तयार करणारा देशातील पहिला आयटीआय संधाता निदेशक ठरला.

आयटीआय वणी जिल्हा यवतमाळ येथील मुनीर शेख यांनी ऊर्जा रूपांतर प्रक्रिया महासागरीय लाटांच्या ऊर्जेत रूपांतर विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारा प्रकल्प तयार करणारा देशातील पहिला आयटीआय संधाता निदेशक ठरला. आज मला आयटीआय निदेशकांची यशोगाथा लिहिताना अतिशय आनंद होत आहे कारण आतापर्यंत मी आयटीआय प्रशिक्षणार्थी यांची यशोगाथा लिहिलेले आणि आपल्यासमोर सादर केले परंतु आज प्रथमच आयटीआय मधील वेल्डर निदेशक यांची यशोगाथा लिहिताना वेगळाच आनंद होत आहे . कारण यांच्या प्रकल्पाने देशाला तसेच जगाला वीज मोठ्या प्रमाणात अत्यंत कमी खर्चात वीज निर्मिती होऊन सगळ्यात स्थरावरील जनतेला अत्यंत कमी दरात वीज मिळेल अश्या प्रकारच्या भव्य दिव्य ऊर्जा रूपांतर प्रक्रिया हा प्रकल्प तयार करणारा शास्त्रज्ञ नसून आयटीआय मधील वेल्डर निर्देशक श्री एम आर शेख सर आहेत.

चला तर जाणून घेऊया मुनीर शेख सर यांच्या विषयी थोडक्यात माहिती त्यांचे जन्मगाव धनोडी तालुका चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती येथील आहे त्यांचे वडील मस्जिद मध्ये मौलवी चे काम करायचे अत्यंत गरीब कुटुंबात मुनीर शेख यांचे जन्म झाले. हे दोन भावंड आहेत त्यांचे वडील मज्जित मध्ये काम करून गावात मिळेल ते काम करून आपला चरितार्थ चालविणे हा त्यांचा नित्यक्रम होता त्यात त्यांनी मुलांना चांगले शिक्षणाचा ध्यास घेतला होता फक्त अल्लाहा परमेश्वरवर संपूर्ण भक्ती भावाने विश्वास ठेवत
मुलांना शिक्षित बनवले.

त्यामध्ये मुनीर शेख यांचे 1990 ते 1993 मध्ये अमरावती येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये यंत्र अभियांत्रिकी मध्ये पदविका पर्यंत त्यांचे शिक्षण झाले शिक्षणाच्या खर्चात ताण वडीलवर खूप येत होते. परंतु ते कधीच डगमगले नाही वडिलांना शिक्षणाचा अनुभव नसतांना सुद्धा मुलांच्या उच्च शिक्षणाचा ध्यास होता. त्यांच्या पाठोपाठ लहान मुलगा सुद्धा उच्चशिक्षण करीत होता आई आणि बाबा रोज मजुरी च्या जोरावर तग धरून होते . जीवाचा आटापिटा करून मुलांना शिक्षणाची ओळख करून दिली मुनीर हा लहानपणापासूनच मेकॅनिकल कामात अत्यंत हुशार होता लहानपणा पासूनच काहीतरी जोड जंतरचे कामे करीत असे.जसे की थ्री एडीएट मुव्ही मध्ये ज्याप्रमाणे आमिर खान यांना संशोधक वृत्तीचा दाखवलेला होता त्याचप्रमाणे मुनीर हा सुद्धा नवनवीन प्रयोग करीत असे.

1990 ते 1993 मध्ये तंत्रनिकेतन अमरावती वरून अभियांत्रिकी मध्ये पदविका चे शिक्षण पूर्ण झाले आणि 1993 ते 95 मध्ये त्यांना सनराइज स्टील प्रायव्हेट लिमिटेड नागपूर येथे नोकरी मिळाली. त्यानंतर नोव्हेंबर 1995 मध्ये आयटीआय मध्ये संधाता निदेशकाची नौकारी मिळाली . त्यावेळी वडिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचा क्षण गगनात मावेनासा झाला होता. त्यावेळी मुनीरच्या वडीलांनी अल्लाहच्या उपकार मानले. ए मेरे अच्छे कर्म का फल है असे म्हणत त्यांनी मज्जिद मध्ये मिठाई वाटली.

श्री.एमआर.शेख शिल्पनिदेशक संधाता या पदावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिखलदरा जिल्हा अमरावती येथे मिळाली. सहा वर्षानंतर विनंती बदलीने आयटीआय यवतमाळ येथे मिळाले. नंतर आयटीआय मारेगाव जिल्हा यवतमाळ. आणि आता सध्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वणी जिल्हा यवतमाळ येथे कार्यरत आहे.

मुनीर शेख सर गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ते स्वतः समुद्रातील लाटांच्या ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जा मध्ये करणारा प्रकल्प पासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प तयार करण्याकरिता काम करीत होते. परंतु डिसेंबर 2021 अखेर आता संपूर्ण प्रोजेक्ट तयार झालेला आहे आता शासनाकडे पेटंट करिता अर्ज पण केलेला आहे त्यांची लहान भाऊ एमसी एम एम बी ए चे शिक्षण पूर्ण करून असिस्टंट सेल्स मॅनेजर या पदावर नोकरी करीत आहे.
आपल्या भारतामध्ये कोळशापासून वीजनिर्मिती, पाण्यापासून वीजनिर्मिती ,यूरेनियम पासून वीज निर्मिती, वाऱ्यापासून वीज निर्मिती अशा अनेक साधनांचा वापर करून देशांमध्ये वीज निर्मिती केली जाते परंतु वरील सर्व बाबी खर्चाच्या दृष्टीने अतिशय महाग पडते. परंतु समुद्रातील लाटांपासून वीज निर्मिती करतांना प्रकल्प उभारण्यासाठी लागणारा खर्च लागेल. त्यानंतर वीज निर्मिती करिता अत्यंत कमी खर्च लागणार आहे परंतु त्यानंतर वीज निर्मिती करिता खर्च लागणार नाही. अत्यंत कमी दरात वीज निर्मिती होऊन
देशाला आर्थिक बाजूला हातभार लागणार आहे .

ही टेक्नॉलॉजी लाँच करण्याची संपूर्ण तयारी झालेली आहे. आणि पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहे या क्षेत्राशी संबंधित देश पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर तज्ञांशी चर्चा करण्यासाठी श्री एम आर शेख यांनी तयारी दर्शविली आहे. आयटीआय मधील इंस्ट्रक्टर अशा प्रकारचा प्रयोग करू शकतो हा विश्वास बसू शकत नाही. परंतु हे ध्येयवेडा असल्यास , चिकाटी आणि लगन असल्यास, कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे मुनीर शेख यांनी सिद्ध करून दाखवले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि कौशल्य विकास व उद्योजकता महाराष्ट्र राज्य, अमरावती विभाग, आदिवास जिल्हा म्हणून ओळखला जाणारा यवतमाळ जिल्हा , डायमंड सिटी म्हणून ओळखला जाणारा वणी, येथील आयटीआय साठी ही बाब अत्यंत गौरवाची आहे.

त्यांचा ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला संस्थेचे प्राचार्य श्री विनोद नागोरे, यांनी भरभरून कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच श्री महेशकुमार दयानंद सिडाम जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ यांनी श्री एम .आर.शेख आणि त्यांचे प्राचार्य श्री . विनोद नागोरे,यांचा अभिनंदन सह पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिला आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...