वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चंद्रपूर : दिनांक 29 जुलै मनपा चंद्रपूर साठी काळा दिवस म्हणायला हरकत नाही, आमसभेत विरोधकांचा गरदोळ, महापौरांचा सुटलेला संयम, आयुक्तांची नगरसेवकांच्या आक्रमकतेपुढचा केविलवानेपणा, त्यानंतर विरोधी नगरसेवकांचे निलंबन ते फौजदारीं तक्रारी च्या गोंधळात दिवसेंदिवस सामान्य जनतेचे प्रश्न संपूर्णतः मागे पडून काय ते राजकीय राडेच बघायला मिळत आहेत.
दिवसभर या घटनाक्रमानंतर शमते ना शमते आणखीन पुन्हा मनपा उपायुक्त विशाल वाघ यांनी महापौर पती नगरसेवक संजय कांचर्लावार यांचेवर अर्रवाच्च्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिल्याने कलम 294,506,186 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात गुरुवारी संपूर्ण दिवस राजकीय गरमा-गर्मीचे वातावरण बघायला मिळत आहे.
उपायुक्त विशाल वाघ यांच्या तक्रारीनुसार आमसभा स्थागित झाल्यानंतर आतरिक्त आयुक्त विपीन पालिवाल यांना दुपारी 2 च्या सुमारास महापौर यांनी त्यांच्या दालनात बोलाविले होते.त्यावेळी दालनात महापौर राखी कांचर्लावार, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, नगरसेवक देवाणंद वाढई, चंद्रकला सोयाम, कल्पना बगूळकर,आशा अबोजवार, छबूताई वैरागडे,मंगला आखरे, खुशबू चौधरी, संजय कांचर्लावार व इतर नगरसेवक उपस्थित होते.
महापौर यांच्या दालनात गेल्यानंतर आजच्या सभेच्या अनुषंगाने काही सूचना् त्यांनी आतरिक्त आयुक्त पालिवाल व उपायुक्त वाघ यांना केल्या. त्यानंतर लगेच काहीही कारण नसताना महापौर पती संजय काचर्लावार यांनी वाघ यांना आर्वच्छ व अश्लील भाषेत शिवीगाळ करत "तुम्ही बाहेरगावचे आहात,सांभाळून रहा-चारचोघे पाठवून कोणत्या वॉर्डात मारून फेकलं कळणार देखील नाही " अशी सर्वांसमक्ष धमकी दिल्याची तक्रार वाघ यांनी शहर पोलीस ठाण्यात नोंदविली.
शेवटी काय राडे करा, धक्के मारा, धमक्या वजा तक्रारी द्या पर्यंत मजली गेल्यावर जनतेच्या हिताचं फलित, शहरात पावसाच्या पाण्याने साचलेल्या एखाद्या डबक्यात डुबवून स्वाहा...
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...