Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / मुकुटबन ठाणेदाराकडून...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

मुकुटबन ठाणेदाराकडून प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार युवकांना खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी.

मुकुटबन ठाणेदाराकडून प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार युवकांना खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी.
ads images
ads images

ठाणेदारावर कार्यवाही करून बदली करण्याची मागणी, जिल्हा पोलिस अधीक्षकासह पोलीस महासंचालकाकडे तक्रार.

Advertisement

आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी) : तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार व प्रकल्पग्रस्त युवकांना मुकुटबन येथील खाजगी कंपन्यांमध्ये नौकरी मिळावी याकरिता मुकुटबन सह परिसरातील 70 ते 80 युवकांनी आंदोलन करून कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. परंतु आंदोलनात पुढाकार घेणाऱ्या तरुणावर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करून बेदम मारहाण करतो अशी धमकी बेरोजगार तरुणाचे नातेवाईक दीपक उदकवार यांना ठाण्यात बोलावून खोटे खंडणीचे गुन्हे दाखल करून बेदम मारहसन करतो अशी धमकी दिली.

Advertisement

तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी एकत्र येत मुकुटबन परिसरातील कोळसा खदान व सिमेंट उदयोगामध्ये स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार युवकांना प्रशिक्षण केंद्र उभारून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे निवेदन 70 ते 80 बेरोजगार युवकांनी कँपनी कडे केली. दोन दिवसानंतर एका कंपनीतील अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून मुकुटबन पोकिस स्टेशनचे ठाणेदार धर्मा सोनुने यांनी निवेदनकर्त्याच्या नातेवाईकाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवून . तुझ्या पुतण्यावर खडणीचे गुन्हे दाखल करून जबर मारहाण करण्याची धमकी दिली.

या घटनेमुळे सर्व निवेदनकर्त्या सुशिक्षित युवकांच्या मनात पोलीस प्रशासनाप्रती विश्वास उडाला व व सदर अधिकाऱ्याच्या अश्या बोलण्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले. जनतेच्या सुरक्षेकरिता असनारी पोलीसच जर भक्षण करीत असेल तर जनतेनी जगावे कसे असा प्रश्न नागरिकांच्या मनात पडला आहे. ठाणेदारांच्या अश्या वागण्यामुळे तरुणांना घराबाहेर पडताना मनात भीती निर्माण झाली आहे.

झरी तालुक्यात आतापर्यंत ५ मोठ्या खदाणी तसेच सिमेंट उधोग आहे.व भविष्यात सुद्धा अनेक कोळसा खदाणी आणि डोलोमाईन्स होणार आहे.तालुक्यात कोळसा, चुनखडी व इतर धातूचा साठा भौगोलिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध असल्याने अनेक मोठं भांडवलदार झरी तालुक्यात येत आहे.मोठं मोठे उधोग उभारून करोडोची संपत्ती करीत आहे.तरी सुद्धा येथील सुशिक्षित बेरोजगार तरुण उधोगमध्ये काम करण्यासाठी लागणारे शिक्षण घेऊनही बेरोजगार आहे. तालुक्यात बेरोजगार युवकाकरिता राजकीय पुढारी व लोकप्रतिनिधी बोलायला तयार नसून फक्त आपल्या कार्यकर्ते व नातेवाईक करिता धावपळ व नौकरी लावण्याकरिता पुढे दिसत असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. तर सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या विषयावर बोलताना दिसत नाही फक्त निवडणूक दरम्यान राजकारण करण्याकरिता फक्त त्यांना विविध आमिष दाखवून वापर करतात. तालुक्यातील तरुण व सुशिक्षित तरुणांनी राजकीय लोकांना सोडून स्वतः आंदोलन करून नौकरी वर लावण्याकरिता आंदोलन केले. परंतु ठाणेदार धर्मा सोनुने यांचे खाजगी कंपनीच्या मधुर संबंधामुळे तसेच कंपणीच्या काही अधिकाऱ्यांच्या मिलीभगत मूळे कंपनी सोडून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी आंदोलन करणाऱ्या तरुणांना दिली . त्यामुळे तालुक्यातील तरुणांमध्ये संतापाचे लाट ऊसळली आहे. थानेदार व कंपनीतील काही अधिकारी मिळून तरुणांच्या उपोषणाला बसू न देण्याचा निर्धार केल्याचे चित्र दिसत आहे.

बेरोजगार व सुशिक्षित तरुणांच्या भविष्या सोबत ठाणेदार व कंपनीचे अधिकारी खेळत असल्याची तक्रार बेरोजगार तरुणांनी केली आहे. खाजगी कंपनी समोर 10 तरुण जरी जमा झाले की ठाणेदार आपले कर्मचारी पाठऊन चोख ड्युटी बजावतात तर कामाकरिता का पाठवत नाही असा संतप्त प्रश्न बेरोजगार युवक करीत आहे. मुकुटबन ठाण्यांतर्गत ठाणेदारांच्या आशीर्वादाने गौतस्करी,अवैध दारू विक्री,मटका,गुटखा तस्करी, अवैध डिझल तस्करी ,अवैध ब्लास्टिंग,अवैध मुरूम तस्करी, सुरू असताना त्यांच्यावर कार्यवाही न करता बेरोजगार युवकावर कंपनीच्या मिलीभगत मुळे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याने ठाणेदार यांच्याविरोधात प्रचंड संताप केल्या जात आहे. खाजगी कंपनीच्या एअर कंडिशन चारचाकी वाहनांमध्ये ठाणेदार खाजगी व शासकीय काम करतांना दिसत आहे . ठाणेदार सोनुने यांनी तरुण युवकांना खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी दिल्याने तरुणात प्रचंड दहशत पसरली आहे. तरी ठाणेदार सोनुने यांचे कॉल डिटेल व सीसीटीव्ही फुटेज काढल्यास घबाड बाहेर येईल. कंपनीच्या हितार्थ काम करणाऱ्या तसेच तरुणांच्या विरोधात काम करणाऱ्या ठाणेदार सोनुने यांच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करून तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी जयंत उदकवार,सुनिल जींनावार,आजाद उदकवार,अनुप धगडी,पंढरीनाथ धांडे,अंकुश ढोके,उमेश पोतराजे, विष्णुकात पेटकर,पंढरीनाथ धांडे, निलेश येडे, व तालुक्यातील तरुण करीत आहे.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...