शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ची संख्या वाढावा, पीपीई किट लावून साधला रुग्णाशी संवाद, घुग्घुस येथील आरोग्य यंत्रणेत लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध होणार
घुग्घुस : चंद्रपूर तालुक्यातील सर्वात मोठे शहर म्हणून घुग्घुस ची ओळख आहे. मोठ्या प्रमाणात येथे वेकोलि परिसर आहे. वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे या राहतात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील राजीव रतन वेकोलिचे रुग्णालय आहे. येथे २८ ऑक्सिजन व २८ साधे बेड्स आहे. वाढत्या रुग्णसंख्या लक्षात घेत येत्या काही दिवसात 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, २ पूर्ण क्षमतेचे व्हेंटिलेटर व ५ एनआयव्ही तसेच ऑक्सिजन प्लॉट लवकरात लवकर उपलब्ध करा तसेच टेम्पो क्लब येथे १०० बेड्सचे स्वतंत्र विलगीकरण करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या.
खासदार बाळू धानोरकर यांनी पीपीई किट लावून कोविड रुग्णाची भेट घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे, सब एरिया पिसा रेड्डी व राजीव रतन वैदकीय अधीक्षक डॉ. आनंद यांच्या कडून रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या असता याठिकाणी ऑक्सिजन कमी पडत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. खासदारांनी या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व्हेंटिलेटर युक्त बेड तातडीने निर्माण करण्याच्या सूचना दिल्या व रुग्णालयात कसल्याही प्रकारे समस्या असल्यास तातळीने आपण प्रशासनाची मदद घ्यावी अश्या सूचना खासदारांनी दिल्या आहेत.
काँग्रेस शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांनी खासदारांना रुग्णवाहिकेची मागणी केली असता एक रुग्णवाहिका तातडीने देणार असल्याचे खासदारांनी कबूल केले. लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध करून देत असल्याची ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रेय, काँग्रेस शहर अध्यक्ष राजूरेड्डी , लक्ष्मण सादलावरजी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे , जिल्हाध्यक्ष पवन आगदारी , कामगार नेते सैय्यद अनवर, यश दत्तात्रय, युवा नेते सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख, गजानन गोहणे, कीशीर बोबडे, प्रेमानंद जोगी, बालकिशन कूळसंगे आदी उपस्थित होते
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...