आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
वणी : २६ नोव्हेंबर संविधान दिन व कामगारांचा राष्ट्रव्यापी संप तसेच शेतकऱ्यांच्या राष्ट्रव्यापी " डेरा डालो, घेरा डालो " ह्या आंदोलनंतर्गत वणी येथील तहसील कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्या समोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागण्यांना घेऊन कॉ.शंकरराव दानव, कॉ.कुमार मोहरमपुरी व कॉ.दिलीप परचाके यांचे नेतृत्वात भव्य निदर्शने व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने एका मागे एक भांडवलदारी, उदारीकरण व जागतिकीकरणाची धोरणे घेत देशातील सामान्य जनतेच्या अधिकारावर गदा आणीत त्यांना गुलामीत टाकणारे कायदे तयार करून राबविणे सुरू केले आहे. प्रचंड आंदोलनातून तयार झालेले कामगार कायद्यांमध्ये बदल करीत कामगारांचे अधिकार कमी केले, तर दुसरीकडे कृषी कायदा करून शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या घशात घालून त्यांना गुलाम करण्याचा प्रयत्न चालविला आहे, त्याच प्रमाणे नवीन शैक्षणिक धोरण आणून त्यामध्ये गरिबांपासून, दलित ,आदिवासी बहुजनापासून शिक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. ह्या मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी देशव्यापी संपात भाग घेत माकप व किसान सभेने वणी येथे तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको केला.
या आंदोलनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांची मदत करावी, पीकविमा योजनेची रास्त अमलबजावणी करून शेतकरयांना फायदेशीर पीक योजना तयार करावी, शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना आधारभावाने कायदेशीर संरक्षण द्यावे, कर्जमुक्ती योजना राबवावी, शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा, नवीन वीज बिल मागे घ्यावा, वन जमीन, महसूल जमीन, तसेच देवस्थान इनामी जमीन कसत असणाऱ्यांच्या नावे करावी, आदिवासींचे पेंडिंग असलेले दावे निकालात काढावे, ईतर पारंपरिक वनजमीन कसणाऱ्यांना या कायद्यातील तीन पिढ्यांची असलेली अट रद्द करावी, कोरोना लॉकडाउन काळातील जनतेचे व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे ह्या मागण्या रेटण्यात येऊन तहसीलदार यांचे मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, दिलीप परचाके, नंदू बोबडे, विपलव तेलतुंबडे रामभाऊ जिड्डेवार, सुधाकर सोनटक्के, कवडू चांदेकर, किसनराव मोहूर्ले, वंदना गेडाम तसेच आशा कर्मचारी संघटनेच्या प्रीती करमनकर त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या ज्योती येरेकर यांचे नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांनिही सक्रिय सहभाग घेतला होता.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...