Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / आई वडील म्हणजेच परमेश्वराचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

आई वडील म्हणजेच परमेश्वराचे रूप : माजी आमदार सुदर्शन निमकर..!

आई वडील म्हणजेच परमेश्वराचे रूप : माजी आमदार सुदर्शन  निमकर..!

105  वर्षीय धोंडुजी मोटघरे यांचा सत्कार

श्रीकृष्ण गोरे (राजुरा) : तालुक्यातील निंबाळा येथील भोई समाजातील प्रतिष्ठित नागरिक धोंडूजी गोविंदा मोटघरे यांनी (वय १०५ वर्ष) वयाच्या १०५ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांच्या चारही मुलांनी सत्कार समारंभाचे आयोजन (दि.१४) केले होते याप्रसंगी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी बोलताना सांगितले की परमेश्वराचे रूप हे आपल्या घरातच असून खऱ्या अर्थाने आई-वडिलांची सेवा केल्यास परमेश्वराची सेवा केल्यासारखे असते. आजच्या स्थितीत बदलत्या जीवनशैली नुसार विभक्त कुटुंब पद्धतीत जीवन जगण्याकडे आजच्या पिढीचा कल वाढला असून अशा परीस्थितीत मोटघरे भावंडं आपल्या आई-वडिलांची सेवा करीत असल्याने वयाचे १०५ ओलांडताना परिवाराला मोठा आनंद होत असल्याचे सांगितले.

यावेळी निमकर यांच्या स्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गावकऱ्यांच्या वतीने भावपुर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला गुलाब महाराज राठोड, ग्रा. पं. सदस्य दीपक झाडे, साखरी येथील काशीनाथ गोरे, चिंचोली येथील माजी सरपंच अर्जुन पायपरे, गोवरी येथील लहू बोरकुटे, पोलीस पाटील पाल, माजी पोलीस पाटील सुरेश उरकुडे, महादेव मेश्राम, विठ्ठल पाल, जनार्धन मोटघरे, साईनाथ शेरकी, मधुकर मोटघरे, भिवसन मोटघरे, जनार्धन मोटघरे, रामचंद्र मोटघरे उपस्थित होते.

गरीब परिस्थिती असतांना सुध्दा प्रत्येक समाजातील युवा पिढीला मार्गदर्शक ठरावा असा स्तुत्य कार्यक्रम घेऊन त्यांच्या डोळ्यादेखत वडिलांचे ऋण फेडल्याबद्धल नातेवाईक व गावकऱ्यांनी धोंडुजी मोटघरे यांचे मुलं मधुकर मोटघरे, भिवसन मोटघरे, जनार्धन मोटघरे, रामचंद्र मोटघरे यांचे अभिनंदन केले. यावेळी मोटघरे परिवाराच्या वतीने गावभोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन दीपक झाडे यांनी तर आभार सुरेश उरकुडे यांनी केले.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...