एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
Reg No. MH-36-0010493
(सौ : सकाळ) : विदर्भातील बळीराजा ज्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होता, त्या मॉन्सूनने बुधवारी विदर्भात (Monsoon enters Vidarbha) अधिकृत ‘एन्ट्री’ केली. प्रादेशिक हवामान विभागाने (Regional Meteorological Department) मॉन्सूनच्या आगमनावर शिक्कामोर्तब केले. मॉन्सूनचे यंदा अपेक्षेपेक्षा लवकर आगमन झाल्याने शेतकऱ्यांसह (Farmers happy) सर्वसामान्यांसाठीही हा सुखद धक्का आहे. गेल्या दहा वर्षांत विदर्भात चौथ्यांदा मॉन्सून लवकर दाखल झाला आहे. (Monsoon-arrives-in-Vidarbha,-early-arrival-for-the-fourth-time-in-ten-years)
हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात अकरा जूनला कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. त्यानंतर मॉन्सूनचे विदर्भात आगमन अपेक्षित होते. तसा अंदाजही आम्ही वर्तविला होता. मात्र केरळकडून आलेल्या मॉन्सूनला पोषक वातावरण मिळाल्याने तीन दिवस आधीच दाखल झाला.
२१ मे रोजी अंदमानातून आगेकूच केलेल्या मॉन्सूनमध्ये अडथळा आल्याने केरळमध्ये तीन दिवस तो उशिरा आला. मात्र त्यानंतर अचानक वेग पकडून उर्वरित महाराष्ट्रासह विदर्भातही चोर पावलांनी हळूच प्रवेश केला. मॉन्सूनने एंट्री केली, पण दणक्यात पाऊस न पडल्याने थोडी निराशाही झाली. मॉन्सूनचे लवकर आगमन झाल्याने बळीराजा खूष असून, विदर्भात लवकरच पेरणीला सुरुवात होणार आहे. सद्यस्थितीत मॉन्सूनने ८० टक्के महाराष्ट्र व्यापला आहे.
आतापर्यंतच्या इतिहासावर नजर टाकल्यास, गेल्या दहा वर्षांत यावर्षी चौथ्यांदा लवकर मॉन्सूनचे विदर्भात आगमन झाले आहे. २०१८ मध्ये ८ जूनलाच मॉन्सून आला होता. सध्या पावसासाठी पोषक वातावरण असल्याने या आठवड्यात विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही जिल्ह्यांत येलो अलर्ट, काही जिल्ह्यांत १२ व १३ जूनला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...