Home / चंद्रपूर - जिल्हा / सीआयएसएफ मधे निवड झाल्याबद्दल...

चंद्रपूर - जिल्हा

सीआयएसएफ मधे निवड झाल्याबद्दल "इन्स्पायर अकॅडमी" तर्फे 'मोनालीचा' सत्कार.

सीआयएसएफ मधे निवड झाल्याबद्दल

ब्रम्हपुरी येथील इन्स्पायर करिअर अकॅडमी ची विद्यार्थिनी मोनाली ढोरे देश सेवेसाठी रवाना.

 सुरज तलमले (प्रतिनिधी ब्रम्हपुरी) : ब्रम्हपुरी येथील इन्स्पायर करिअर ॲकॅडमी ची विद्यार्थिनी मोनाली ढोरे हिची सीआयएसएफ मध्ये निवड झाली त्याबद्दल इन्स्पायर अकॅडमी तर्फे मोनाली चा सत्कार करण्यात आला मोनाली ही ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन (खरकाडा) या ग्रामीण भागातील असून शेतकरी कुटुंबातून आलेली आहे. मोनालीला आधीपासूनच देशसेवेची आवड असल्यामुळे महाविद्यालयीन अभ्यासक्रमात एनसीसी घेऊन पोलीस भरती व आर्मी भरतीची तयारी सुरू होती व आपल्या मेहनतीने व जिद्दीने सीआयएसएफ मध्ये तिची निवड झाली. यामधे तिची जीद्य, मेहनत, अभ्यासुवृत्ती इतरांसाठी प्रेरणादायी ठरावी अशीच आहे. रनमोचन सारख्या लहानशा गावातुन देशसेवेसाठी मोनालीची निवड होणे ही रणमोचन गावासाठी अभिमानास्पद बाब आहे. सदर यश संपादन करुन मोनालीने गावाचे व कुटुंबाचे नाव रौशन केले असुन जिल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कारण या गावातील ही पहीलीच विद्यार्थीनी ठरली आहे. त्यामुळे मोनालीचा सर्व स्थरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

मोनालीने सदर निवडीचे श्रेय तीचे आईवडील तसेच इन्स्पायर करिअर अकॅडमी चे मार्गदर्शक वृंद यांना देत पुढे म्हणाली की, मी सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने पुणे, नागपुर सारख्या ठिकाणी जाऊन मला परिक्षेची तयारी करणे शक्य झाले नसते. म्हणूनच कदाचीत इन्स्पायर अकॅडमी नसती तर मला स्पर्धा परीक्षा काय असते याची जानीव झाली नसती. शीवाय वेळोवेळी लाभलेले सर्वोत्कृष्ट असे मार्गदर्शन मला मिळालेच नसते. आणी आज मी यशस्वी झाले नसते व मी देशसेवेला मुकले असते. म्हणुनच माझी झालेली निवड यात इन्स्पायर अकॅडमी चा मोलाचा वाटा आहे अशी मोनाली अभिमानाने सांगते आहे. 

 सदर सत्काराप्रसंगी इन्स्पायर अकॅडमीच्या संस्थापिका तसेच लिटिल फ्लावर स्कूल च्या प्राचार्य एकता गुप्ता मॅडम, इन्स्पायर अकॅडमीचे संचालक प्रा. लक्ष्मण मेश्राम सर, मार्गदर्शक प्रा. तेजस गायधने सर, दीपक सेमस्कर सर, आंबोरकर सर, खरवडे सर, दीपाली चाचेरे म्याडम   राहुल मैन्द ,मंगेश ढोरे व अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते. मोनाली चा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करून तिला शुभेच्छा देऊन देशसेवेसाठी रवाना करण्यात आले. यामुळे मोनाली अगदी भारावुन गेली होती. त्यामुळे इन्स्पायर करिअर अकॅडमी चे मोनालीने तोंडभरून कौतुक केले असुन सर्व मार्गदर्शक यांचे विशेष आभार मानले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...