Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / अल्पवयीन मुलीचा विनयभंग,...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस अटक..

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस अटक..

वणी: शहरातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. खडबडा मोहल्ला येथे ही घटना मंगळवारी उघडकीस आली असून आरोपी हा देखील या परिसरातील रहिवासी आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सविस्तर वृत्त असे की १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आंघोळी करिता गेली की, आरोपी हा चोरून लपून तिला बघायचा. आरोपी चे नेहमीचे कृत्य तिच्या लक्षात येताच तिने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. १ जूनला दुपारी २ वाजता मुलीस आरोपी तिच्याकडे लपून बघत असल्याचे कुटुंबियांच्याही लक्षात आले. परत २ जूनलाही १.३० वाजता असेच कृत्य केल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुलीच्या पालकांनी मुलीला घेऊन सरळ पोलीस स्टेशन गाठले. खडबडा मोहल्ला येथे राहणारा ३६ वर्षीय युवक हा मुलगी आंघोळ करित असतांना चोरून लपून बघतो, अशी तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविण्यात आली. २ जूनला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ही तक्रार नोंदविण्यात आली.

मुलीच्या तक्रारी वरून पोलिसांनी ३६ वर्षीय या आरोपीस अटक करून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३५४, ३२३, ५०४ व सहकलम १२ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय माया चाटसे करीत आहे.

ताज्या बातम्या

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणीतील बातम्या

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...