Home / चंद्रपूर - जिल्हा / पिंपळगाव (भोसले) येथे...

चंद्रपूर - जिल्हा

पिंपळगाव (भोसले) येथे सेवा सहकारी सोसायटी कडून शेतकरी व शासनाची दिशाभूल -क्रिष्णाभाऊ सहारे 

पिंपळगाव (भोसले) येथे सेवा सहकारी सोसायटी कडून शेतकरी व शासनाची दिशाभूल   -क्रिष्णाभाऊ सहारे 

सोसायटी अध्यक्ष व सचिवावर कारवाई करा  -उपविभागीय अधिकारी यांना निवेदन 

ब्रम्हपुरी: धान खरेदी करतांना सर्वप्रथम बाजार समितीने दिलेल्या टोकन नुसार शेतकऱ्यांनी शासनाच्या अधिकृत पोर्टल वर शासनाने ठरवून दिलेल्या कालावधी मध्ये खरेदी केंद्रावर  जाऊन ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच धान खरेदीसाठी खरेदी केंद्रामार्फत एसएमएस देऊन धान्य खरेदीसाठी तारीख दिली जाते, व त्यानुसार खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून धानाची खरेदी करून ऑनलाईन लॉट एंट्री केल्या जाते.

मात्र तालुक्यात कुठेही आधारभूत रब्बी धान खरेदी केंद्र चालू नसतांना पिंपळगाव सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत येणाऱ्या 9 गावामधून फक्त पिंपळगावातीलच 75 शेतकऱ्यांकडून 3197.20 क्विंटल रब्बी आधारभूत धान खरेदी करून हितसंबंध जोपासात  सेवा सहकारी सोसायटी पिंपळगाव (भोसले) येथील अध्यक्ष व सचिव यांनी शासनाची व शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचे प्रकार उघडकीस आलेला आहे.

ईतर आठ गावे ज्यात सोंद्री, लाडज, चिखलगाव, चिंचोली, सुरबोडी, सोनेगाव सावलगाव, हरदोली हे सर्व गावे पिंपळगाव (भोसले) सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत येत असतांना फक्त पिंपळगाव येथील शेतकऱ्यांचे धान खरेदी झाली असल्याने उर्वरित आठ गावातील शेतकऱ्यांना सोसायटी कडून रब्बी धानाच्या खरेदी बाबत कोणत्याही प्रकारची माहिती न देता, सोसायटीचे सचिव व अध्यक्ष यांनी मनमानी कारभार करून शासनाची दिशाभूल करत, शेतकऱ्यांच्या जीविताशी खेळून अक्षम्य गुन्हा केलेला आहे, करिता उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना निवेदन देत संबंधित खरेदीवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली तर निवेदनाची प्रतिलिपी खासदार श्री अशोक नेते, आमदार श्री बंटीभाऊ भांगडिया व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पाठविण्यात आले.

निवेदन देतांना श्री क्रिष्णाभाऊ सहारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रपूर व जिल्हा परिषद सदस्य, श्री विलास उरकुडे माजी पंचायत समिती उपसभापती, सुधीर दोनाडकर, टिकाराम ढोरे,विनोद दोनाडकर, बाळकृष्ण शेंडे,हरिभाऊ शेबे, गजानन ढोरे,हेमराज कामडी, संतोष आडकीने,विलास कुथे, प्रमोद टिकले, विनोद कुथे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...