वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
झरी तालुक्यातील घटना, आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल
आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी) : एका तरुणाने शाळेत शिकणा-या एका अल्पवयीन मुलीचे जिवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी बळजबरीने शारीरिक शोषण केले. दरम्यान पीडित मुलगी 6 महिन्याची गर्भवती राहिली. या प्रकरणी जुनोनी येथील एका तरुणावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की पीडिता ही तालुक्यातील एका गावातील रहिवाशी आहे. आई वडिलांसह ती राहते. तालुक्यातीलच एका आश्रम शाळेत ती शिकायची व तिथेच राहायची. 2019 रोजी दिवाळीच्या सुट्टीत पीडिता ही शाळेतून घरी आली. त्यानंतर ती शाळेत गेलीच नाही. 11 जुलै 2021 रोजी पीडितेने तिच्या आईला पोट दुखत असल्याचे सांगितले. त्यामुळे तिच्या आईने तिला वणीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी चेकअप करून ती साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. हे ऐकूण पीडितेच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. घरी आल्यावर पीडितेच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता धक्कादायक बाब पुढे आली.
जुनोनी गावात विलास तुकाराम आत्राम (25) हा तरुण राहतो. शाळेत शिकताना एके दिवशी ती बाजारात गेली असता आरोपीने तिला गाठले व तिच्याशी ओळखी वाढवली. एके दिवशी पीडिता प्रात:विधीला गेली असता आरोपीने तिचा पाठलाग केला. पीडितेला थांबवून त्याने तिला एका शेतात नेऊन बळजबरीने शोषण केले.
त्यानंतर आरोपी गावात यायचा व तो पीडितेला धमकावत वेळोवेळी तिचे शोषण करायचा. पीडितेने नकार दिला किंवा कुणाला काही सांगितल्यास आईवडिलांना ठार मारेल अशी धमकी आरोपी द्यायचा. दरम्यान 15 दिवसाआधी पीडिता गर्भवती असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना झाली. 12 जुलै रोजी पीडितेची आई ही आरोपीस याबाबत विचारणा करण्यास जुनोनी येथे गेली असता तिथेही आरोपीने पीडितेच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली.
पीडितेच्या आईने सदर बाब तिच्या नातेवाईकांना सांगितले असता त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास हिम्मत दिली. अखेर पीडितेच्या आईने मुकुटबन पोलीस स्टेशन गाठत आरोपी विलास तुकाराम आत्राम (25) याच्या विरोधात तक्रार दाखल केली. आरोपीविरोधात भादंविच्या कमल 376 (2)(N) 376 (A)(1) बाललैंगिक अत्याचार कायदा (पोस्को) च्या कलम 4 व 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड, जितेश पानघाटे, प्रवीण तालकोकुलवार करीत आहे
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...