Home / चंद्रपूर - जिल्हा / दिवाळीपूर्वी खाण कामगारांना...

चंद्रपूर - जिल्हा

दिवाळीपूर्वी खाण कामगारांना थकित वेतन द्यावे -पालकमंत्री विजय वडेट्टीवार

दिवाळीपूर्वी खाण कामगारांना थकित वेतन द्यावे -पालकमंत्री विजय वडेट्टीवार

दिवाळीपूर्वी खाण कामगारांना थकित वेतन द्यावे -पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर दि. 31 ऑक्टोबर: कर्नाटक पावर कॉर्पोरेशन लिमिटेड व बरांज कोल माईन्स येथे काम करणाऱ्या कामगारांचे वेतन दिवाळीपूर्वी देण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी खाण प्रशासनाला दिले. मागील 10 महिन्यांपासूनचे वेतन अद्यापही मिळाले नाही. परिणामी या कामगारांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे. तरी दिवाळीपूर्वी कामगारांना तातडीने 4 महिन्याचे थकित वेतन देण्याची अंमलबजावणी  करावी, असे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात  कर्नाटक पावर कॉर्पोरेशन लि. व  बरांज कोल माईन्स येथील कामगारांच्या किमान वेतन संबंधाने व इतर तक्रारीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासमवेत आमदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वरोराचे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, मुलचे उपविभागीय अधिकारी श्री.खेडकर, बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. नैताम प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्व कामगारांना तातडीने किमान वेतन देण्याचे नियोजन करावे असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, केपीसीएलकडे खाण सुरू झाल्यापासून कामगारांचे 21 महिन्याचे वेतन प्रलंबित आहे. त्यापैकी कामगारांना दिवाळीपूर्वी 4 महिन्याचे वेतन देण्याचे करावे व उर्वरित 6 महिन्याचे वेतन डिसेंबर अखेरपर्यंत देण्यात यावे. व शिल्लक राहिलेल्या 11 महिन्याचे वेतन किमान वेतन ठरविल्यानंतर देण्यात यावे. कामगारांना वेतन न दिल्यास खाणीचे कामकाज बंद करण्यात येईल अशा सूचनाही त्यांनी  दिल्या.

 महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त पुनर्वसन सायवन, आवंढा, कचराळा व  गुंजाळा येथील पुनर्वसितांना भूखंडाचे पट्टे वाटप करून देण्यासंदर्भात  पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांनी आढावा घेतला. जमिनीचे पैसे भरून मालकी हक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही तातडीने करावी. व माहे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जमिनीचे पट्टे तातडीने वाटप करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

त्यासोबतच, कोरोना आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना 5 लक्ष रुपयांचे फिक्स डिपॉझिट पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हा महिला बालविकास अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर व कल्पना राजूरकर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...