Home / चंद्रपूर - जिल्हा / जिल्हा अन्न तसेच निरोगी...

चंद्रपूर - जिल्हा

जिल्हा अन्न तसेच निरोगी आहार समिती तथा जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक

जिल्हा अन्न तसेच निरोगी आहार समिती तथा जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक

चंद्रपूर दि. 31 डिसेंबर :  शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांचेमार्फत राज्य व जिल्हा स्तरावर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 ची प्रभावी अंमलजबजावणी, नियंत्रण व समस्यांचे निराकरण करण्याकरीता गठीत समित्यांची पुनर्रचना करुन सुधारीत आदेश निर्गमित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने, जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी विद्यूत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. 

अन्न व औषध प्रशासनाने सन 2021-22 मध्ये एकूण 135 नमुने विश्लेषणासाठी घेतले. त्यापैकी 81 नमुने प्रमाणित तर 3 नमुने कमी दर्जाचे घोषित झाले आहे. तसेच 15 नमुने (प्रतिबंधित अन्न पदार्थ) असुरक्षित घोषित असून 36 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असल्याचे तसेच अन्न व औषध प्रशासनामार्फत एकूण 6 परवाना व नोंदणीचे कॅम्प घेवून 700 नवीन अन्न परवाना व नोंदणी अर्ज प्राप्त करुन घेतले. रिपर्पज युज्ड कुकिंग ऑइल मोहिमेअंतर्गत एकूण 50 आस्थापनांच्या तपासण्या करण्यात येवून कोणत्याही अन्न आस्थापनेत टोटल पोलार कम्पाऊंड 25 पेक्षा जास्त नसल्याचे श्री.मोहिते यांनी बैठकीत सांगितले.

प्रशासनामार्फत विविध अन्न आस्थापना यांना केंद्रीय अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे मार्फत मानांकित ऑडीटर्सद्वारे एकूण 250 अन्न व्यवसायीकांना अन्न पदार्थ हाताळणीचे, स्वच्छतेचे तसेच कोवीड संक्रमण काळात घ्यावयाच्या काळजीबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

या बैठकीमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. रिपर्पज युज्ड कुकिंग ऑईलची मोहीम यशस्वीपणे राबविण्यात यावी याकरिता नवीन यंत्रसामग्री खरेदी करण्याकरीता जिल्हा नियोजन समितीअंतर्गत प्रस्ताव सादर करावा. शासकीय, निमशासकीय रेशन दुकान यांनी अन्न परवाना व नोंदणी प्राप्त करुण घेणे बंधनकारक असल्याने त्यांनी परवाना व नोंदणी करुन घ्यावी. याकरीता जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच सहाय्यक आयुक्त (अन्न),अन्न व औषध प्रशासन यांनी कार्यवाही करावी, तसेच ईट राईट इंडिया मोहिमेअंतर्गत ज्या कंपन्यांमध्ये कॅन्टीन अथवा उपहारगृह आहे, अशा कंपन्यांनी केंद्रीय अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण यांचेकडील हायजीन रेटींग तसेच कॅम्पस सर्टिफिकेशन घ्यावे. याकरीता जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक, अन्न व औषध प्रशासन यांनी सदर कंपन्यांना उद्युक्त करावे, असे निर्देश  अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिले.

सदर बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक स्वप्नील राठोड, जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी,सुरेंद्र दांडेकर, सचिन वालकर, डॉ. सचिन भगत,सदस्य सचिव तथा सहाय्यक आयुक्त (अन्न) नितीन मोहिते, अन्न सुरक्षा अधिकारी, प्र. भा. टोपले, प्र.अ. उमप प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...