Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / ब्रम्हपुरी येथे सर्व...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरी येथे सर्व पक्षीय व विविध जन संघटनेच्या वतीने बैठक संपन्न..!

ब्रम्हपुरी येथे सर्व पक्षीय व विविध जन संघटनेच्या वतीने बैठक संपन्न..!

27 सप्टेंबर भारत बंद निमित्त, ब्रम्हपुरी येथे विराट बैलबंडी ट्रॅक्टर मोर्चा काढण्या चा निर्णय..!

ब्रम्हपुरी(प्रतिनिधी): गेल्या 9 महिन्या पासून शेतकरी विरोधातील तीन काळे कायदे रद्द करा.एम.एस.पी. चा कायदा करा.वीज विद्युत विधेयक 2020 रद्द करा या मागणीसाठी दिल्ली येथे शेतकरी आंदोलन सुरू आहे.जवळपास 400 शेतकरी या आंदोलनात शहीद झाले.परंतु केंद्र सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही.तेव्हा सदर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने 27 सप्टेंबर 2021 रोजी भारत बंद ची घोषणा केली आहे तेव्हा सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी ब्रम्हपुरी येथील  गंगाबाई तलमले कॉलेज मध्ये 23 सप्टेंबर रोजी मा.प्रभाकर सेलोकर काँग्रेस चे तालुका कार्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय व विविध जन संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.विनोद झोडगे,शेतकरी नेते तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ऍड गोविंद भेंडारकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष वासू सौंदरकर,विधान सभा प्रमुख जगदीश पिलारे,शिवसेना तालुका अध्यक्ष  नरू नरड, शहर प्रमुख किशोर चौधरी,संजय मगर बी. आर.एस.पी.महासचिव,विधान सभा प्रमुख गोपाल मेंढे,तालुका अध्यक्ष मार्कांड बावणे,रोशन मेंढे बी. आर.वी.एम., अँड हेमंत उरकुडे प्रहार तालुका अध्यक्ष,सचिन मंडपे, ड्रा.जयप्रकाश धोंगडे समता सैनिक दल संघटन सचिव, प्रा.राकेश तलमले ओ.बी.सी.संघटना,राहुल भोयर राष्ट्रवादी काँग्रेस,राजेश माटे,बापूजी भरडकर, उतमराव ढोंनगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यामधे सर्वांनी आपले विचार व्यक्त करून 27 सप्टेंबर भारत बंद निमित्त संपूर्ण ब्रम्हपुरी शहरासह ग्रामीण भागात सुद्धा कडकडीत बंद पाळून सकाळी 11 वाजता हुतात्मा स्मारक येथून विशाल बैल बंडी,टॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा सर्वानु मते ठरविण्यात आले आहे.या भारत बंद आंदोलन मध्ये शेतकऱ्यानं सह ईतर जनतेनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी विविध पक्ष व  सामाजिक जन संघटनेची विस्तारित बैठक 25 सप्टेंबर रोजी रात्रौ 7.00 वाजता गंगाबाई तलमले कॉलेज येथे आयोजित केली असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चा तालुका समन्वयक तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.विनोद झोडगे यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...