Home / चंद्रपूर - जिल्हा / लस घेतली असेल तरच बाजारात...

चंद्रपूर - जिल्हा

लस घेतली असेल तरच बाजारात प्रवेश

लस घेतली असेल तरच बाजारात प्रवेश

कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मनपाचे कडक पाऊल

चंद्रपूर, ता. १० : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. फेरीवाले, सेवापुरवठादार यांनी लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र दाखवावे, अन्यथा बाजारात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे.

मनपा कार्यालयातील सभागृहात महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीला आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, सहाय्यक आयुक्त विद्या पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांच्यासह आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य विभागाची चमू उपस्थित होती.    

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून लसीकरण केंद्रावर जानेवारी ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत १ लाख ९३ हजार ५८१ नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली, तर यातील ९९ हजार ६२० नागरिकांची दुसरी मात्रा पूर्ण झाली आहे. मात्र, शहरातील एकूण पात्र व्यक्तींच्या तुलनेत लसीकरणाचा आकडा अद्याप कमी आहे. आरोग्य विभागाने शहरात २१ केंद्रांवर लसीकरणाची सोय उपलब्ध केली आहे. त्यामुळे सर्व पात्र व्यक्तींनी तातडीने लस घ्यावी, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार केले आहे.

शहरात शंभर टक्के लसीकरण करण्याचे निर्देश शासनाचे आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबरच्या आधीच उद्दिष्ट घेऊन प्रत्येक आस्थापनाने कर्मचाऱ्यांची व सामान्य नागरिकांचे लसीकरणाचे नियोजन करा, असे निर्देश आयुक्त राजेश मोहिते यांनी बैठकीत दिले.  

औद्योगिक वसाहती, उद्योग समूह या ठिकाणच्या कर्मचारी, कामगारांनी किमान पहिला डोस घेतल्याचा पुरावा दाखविणे बंधनकारक असून, वेगवेगळ्या उद्योग समूहात काम करणाऱ्या कामगारांना कामावर घेताना, मजुरांना काम देताना प्रत्येकाचे दोन डोस झाले आहे, याची  खातरजमा करणे गरजेचे आहे. जनतेशी सतत संपर्क येणाऱ्या प्रत्येक सेवापुरवठादार, फेरीवाले, भाजीविक्रेते यांनी लसीकरण करणे बंधनकारक असून, मनपाची चमू गोल बाजार, गंज मार्केट आणि भाजी विक्रीच्या ठिकाणी लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र तपासणी करणार आहे. त्यामुळे सर्वानी तात्काळ लस घ्यावी, शिवाय प्रमाणपत्र सोबत ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा. 24 January, 2025

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा.

वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* 24 January, 2025

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या*

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-चिमूर लोकसभा...

वणी येथील रिलायन्स मॉलमध्ये एक्सपायर मालाची विक्री, मनसेचे स्टिंग ऑपरेशन 24 January, 2025

वणी येथील रिलायन्स मॉलमध्ये एक्सपायर मालाची विक्री, मनसेचे स्टिंग ऑपरेशन

वणी :शहराचं सुसज्ज आणि अत्याधुनिक व्यापार पेठ म्हणून यवतमाळ रोडवरील शेवाळकर व्यापारी संकुलाकडे पाहिले जाते. याच व्यापारी...

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* 24 January, 2025

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले*

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* ✍️मुनिश्वर बोरकर ...

शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव. 24 January, 2025

शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव.

वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वच्छ भारत...

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी*    *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत*    24 January, 2025

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत*

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...