नायब तहसीलदार ओंकार ठाकरे यांचा पर्यावरण संदेश; वृक्ष वाचावा, जीवन वाढवा
राजुरा : जीवनातील एखादा नवप्रवास सुरुवात करतांना हातून शुभ कार्य करून हा प्रसंग कायम स्मरणात राहावा अशी प्रत्येकांची इच्छा असते. याचाच प्रत्यय ओंकार ठाकरे या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात घराच्या परिसरात चंदनाचे झाड लावून केल्याचे दिसून येते. विवाह सोहळ्याप्रसंगी पारंपरिक रीतिरिवाज सोबतच सहचारिणीसोबत नव्या संसाराचा आरंभ वृक्षारोपण करून केल्याने समाजापुढे एका नवा आदर्श निर्माण झाला आहे.
नुकतेच मूल तहसिल कार्यालय येथे नायब तहसीलदार पदावर रुजु झालेले राजुरा येथील विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष केशव ठाकरे यांचे चिरंजीव ओंकार ठाकरे व प्रगतशील शेतकरी बाबाराव कावळे यांची कन्या मृणाली यांचा विवाह सोहळा कोविड-१९ चे नियम पाळून अगदी सध्या पध्द्तीने संपन्न झाला. पर्यावरणाची आवड असलेल्या ओंकार ने आपापल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात घराच्या परिसरात चंदनाच्या झाडांची लागवड करून वृक्ष लावा वृक्ष जगवा, जीवन वाढावा असा संदेश देत वृक्षारोपण केले आहे.
यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर, केशवराव ठाकरे, नथुजी निब्रड, नानाजी ठाकरे, देवराव निब्रड, लता ठाकरे, पांडुरंग एकरे, भाऊराव झाडे, डॉ. समीक्षा निब्रड, सुधीर झाडे, सुमित्रा ढवस, अर्चना ठवरी, हेमंत एकरे यांची उपस्थिती होती.