आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मृतकाच्या पत्नीने दिली होती तक्रार, आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चक्क 3 आरोपीवर झाला गुन्हा दाखल
मारेगाव (प्रतिनिधी) : गेल्या आठवड्या भरापासून बहुचर्चित असलेल्या हटवांजरी येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणी अखेर मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.यात मृतकाच्या विधवा पत्नीच्या तक्रारी वरून चक्क 3 आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.यात भूमिअभिलेख कार्यालयातील एका भुमापका सह दोन पोट हिस्सेदाराचा समावेश आहे.
यात कोमल तुमस्कर (37), वासुदेव कृष्णा एकरे (71),राजु नामदेव एकरे (40) रा.हिवरा मजरा असे आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहिती नुसार मृतकाची मूळ शेती एका प्रकल्पात भूसंपादित झाली.व मिळालेल्या मोबदल्यातून मृतकानी मार्डी नजीक हिवरा मजरा येथे गट न.69/4 पैकी 1 हे 30 आर शेतजमीन खरेदी केली.शेताचा कायदेशीर सात बारा मृतकाच्या नावे झाला.दरम्यान मोजणी शिटमध्ये येथील भुमापकाने पोट हिस्सेदारांच्या संगणमताने घोळ केला होता.23/2/2020 ला पहिल्या मोजणीत तीन हिस्से तर दिनांक 13/8/2020 ला दुसऱ्या मोजणीत पाच हिस्से तर यामध्ये मृतकाच्या वाटयास 1 हे 30 आर ऐवजी केवळ 0 हे 40 आर इतकेच क्षेत्र मोजणी शीट मध्ये दर्शविण्यात आल्याने मृतकाला पूर्ण शेत जमीनीचा ताबा मीळाला नव्हता.तर उर्वरित क्षेत्रात पोट हिस्सेदाराने कब्जा केला होता.
मृतकाने मृत्यु पूर्वी वारंवार न्यायाची मागणी भूमिअभिलेख कार्यालया कडे केली.मात्र पिडीत शेतकऱ्यांच्या मागणी कडे दुर्लक्ष करण्यात आले होते. दरम्यान न्याय न मिळाल्यास सहकुटुंब उपोषण करण्याचा इशारा दिला होता.तसेच उपोषणास अडथळा केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा ही वरिष्ठाकडे पाठविलेल्या एका तक्रारीतून पिडीत शेतकऱ्यांने दिला होता. मात्र वरिष्ठानी या प्रकरणाची दखल घेतली होती.परंतु येथील कार्यालय प्रमुखाने कर्तव्याची सिमा ओलांडून वरिष्ठानच्या आदेशाला ही केराची टोपली दाखवली.या बाबीकडे गांभीर्याने घेतले नसल्याने अखेर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांने अखेर 27 जुलै रोजी विष प्राशन करून आपली जिवन यात्रा संपवली.
मृतक शेतकऱ्याची पत्नी मनीषा फरताडे यांनी 29 जुलै रोजी दिलेल्या तक्रारी वरून 3 ऑगस्ट च्या रात्री उशिरा परंत या प्रकरणी शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपिवर 306,34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी तपासाअंती पुन्हा आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.पुढील तपास ठाणेदार जगदीश मंडलवार यांचे मार्गदर्शनात होत आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...