वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
पैठण येथे संतपीठ, निजामकालीन १५० शाळांचा पुनर्विकास, परभणी येथे वैद्यकीय महाविद्यालय, शिर्डी- औरंगाबाद महामार्गाची हवाई चाचपणी, जालना-नांदेड आणि पुढे हैदराबादपर्यंचा मार्ग समृद्धी महामार्गाशी जोडणे, मराठवाड्यातील जिल्ह्यात २०० मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती यासह औरंगाबाद शहर विकासासाठी अनेक विकासकामांची घोषणा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याला दिलासा दिला.
मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभानंतर मराठवाड्यातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात ते म्हणाले, ‘ संघ राज्यात सामील होण्यास निजामाने नकार दिला होता. त्याची मस्ती वल्लभभाईंनी उतरवली. तो जसा जीवघेणा लढा होता. तसा कोविडचा लढा दिला. पण आरोग्य यंत्रणेसह सर्व प्रशासकीय यंत्रणेने तो लढाही दिला. हा लढा संयमाने जिंकावा लागणार आहे. मराठवाडा एका अपेक्षेने या सरकारकडे पाहत आहे. हा भूभाग संतांची भूमी असल्याने संतपीठ सुरू केले जात आहे. पण हे संतपीठ स्वतंत्र विद्यापीठ व्हावे अशी इच्छा असल्याचे सांगत निजामकालीन शाळा हे काही वैभव नाही त्यामुळे १५० शाळांचा पुनर्विकास करण्यासाठी निधी दिला आहे.’ या पूर्वी अनेक जण आले आणि बोलून गेले. केवळ बोलघेवडे सरकार असून चालणार नाही. सर्व प्रकल्प मार्गी लावू असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. मराठवाड्यातील विकासाच्या विविध प्रकल्पाची घोषणा त्यांनी केली. रखडलेल्या जलसंजाल (वॉटर ग्रीड) योजनाही सुरू केल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठवाडा मुक्ती दिनाच्या ध्वजारोहण समारंभास खासदार इम्तियाज जलील यांनीही पहिल्यांदाच हजेरी लावली. तत्पूर्वी ‘एमआयएम’ ने शिवसेनेने दिलेल्या १४ महापौरांमुळे शहराचा विकास खूप झाला असे म्हणत मुख्यमंत्र्याच्या ताफ्यावर फुलांची उधळण केली आणि न झालेल्या कामांचे फलक दाखवून ते पूर्ण झाले आहेत त्याबद्दल धन्यवाद असा मजकूर लिहिलेले फलकही दाखविले. या आंदोलनातील कार्यकत्र्यांना टोला लगावत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,‘असा विकास तुम्हालाच लखलाभ. आम्ही आता विकासाला सुरुवात केली आहे.’ औरंगाबाद- शिर्डी हे अंतर काही मिनिटावर यावे यासाठी हवाई मार्गाची चाचपणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. औरंगाबाद- नगर हा नवा रेल्वे मार्गही करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी वित्तराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी रावसाहेब दानवेंकडे शब्द टाकावा असेही ते म्हणाले.
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...