Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / झरी नपं निवडणुकीसाठी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

झरी नपं निवडणुकीसाठी अनेकांची दावेदारी ।। स्वबळावर प्रत्येक पक्ष लढणार..!

झरी नपं निवडणुकीसाठी अनेकांची दावेदारी ।। स्वबळावर प्रत्येक पक्ष लढणार..!

स्वबळावर प्रत्येक पक्ष लढणार : अपक्षांची निर्णायक भूमिका

झरी हे तालुक्याचे ठिकाण असून याला ग्रामपंचायतचा दर्जा होता. मात्र शासन निर्णयानुसार झरी ही सर्वात लहान नगर पंचायत म्हणून 8 एप्रिल 2015 ला निर्माण करण्यात आली. पहिल्या निवडणुकीत या नगर पंचायतमध्ये झरी आणि शिरोला या दोन गावांचा समावेश होता. त्याची लोकसंख्या केवळ 1775 होती. पहिल्या निवडणुकीमध्ये 17 प्रभाग असणार्‍या या नगर पंचायतीत प्रत्येक वॉर्डात केवळ 10 ते 30 मतदार संख्या होती. काही प्रभागांत तर 10 पेक्षाही कमी मतदार होते. या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांची सत्ता आली होती. अडीच वर्षे भाजपा व सेना आणि अडीच वर्षे भाजपा व अपक्ष यांच्याकडे सत्ता होती.

झरीलगतच्या जामनी ग्रामपंचायतने आपला विकास करून घेण्यासाठी झरी नगर पंचायतीत समाविष्ट करून घेण्यासाठी 5 वर्षे सतत न्यायालयीन लढाई लढलेली आहे. त्यांना यात यश आल्याने प्रशासनाने झरी नगर पंचायतीत जामनी ग्रामपंचायतला समाविष्ट करून घेण्याचे आदेश दिले आहेत. जामनी ग्रामपंचायतीत दुर्गापूर आणि सालेभट्टी याही गावांचा समावेश होतो. वास्तविक सालेभट्टी ते झरी हे अंतर 7 किमीचे आहे. या तीन गावांचा समावेश झाल्याने प्रभागांची रचना बदलली आहे. मतदारही वाढले असून अनेकांचे विजयाचे गणित यामुळे बिघडले आहे.

या तिन्ही ग्रामपंचायतींचा पाहिजे तसा विकास झालेला नव्हता. मात्र आता नपंमध्ये समाविष्ट झाल्यामुळे या तीन गावांचा विकास होईल. नपं निवडणुकीसाठी निघालेल्या आरक्षणात अनुसूचित जमातीसाठी प्रभाग 1, 3, 11, 14 आणि अज महिलांसाठी 2, 3, 12, 15, 16 आहेत. तर अनुसूचित जाती महिलांसाठी प्रभाग 4 राखीव आहे. महिलांसाठी प्रभाग 5, 7, 9, 10 राखीव आहेत. तर सर्वसाधारण प्रभाग 8, 13, 17 आहेत.

या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून भाजपा, शिवसेना, काँग्रेस व मनसे तसेच जंगोम दल व अपक्षही यात आहेत. दहा दिवसांपूर्वी मनसेने झरी येथे भव्य मेळावा घेतला होता. या मेळाव्यात हजारो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश घेतला. कमी मतदारसंख्या असलेल्या प्रभागांमध्ये ज्या कुटुंबाकडे जास्त मतदार आहेत त्यांची निर्णायक भूमिका राहणार आहे. प्रत्येक प्रभागात फारच कमी मतदार असल्यामुळे प्रत्येक मताला फार महत्त्व असणार आहे. अशावेळी गैरप्रकारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या निवडणुकीत सर्वच गट स्वबळावर लढणार असून निवडणूक निकालानंतर बहुमत मिळाले नसेल तर कोण कोणाशी हात मिळवेल हे सांगता येत नाही. सध्यातरी अनेक पक्ष आणि अपक्ष आपापले उमेदवार उभे करण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कोणत्या एका गटाला बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. गेल्या निवडणुकीत 17 जागांपैकी भाजपा 7, शिवसेना 1, काँग्रेस 3, राकाँ 1 आणि अपक्ष 5 अशा जागा आहेत. परिसरातील नाल्यांची सफाई, आठवडी बाजाराचा प्रश्न व मागील पंचवार्षिकमध्ये न झालेला विकास यावेळी करून दाखवू, तसेच झरीतील अनेक गरजूंचे घरकुलांचे निधीअभावी अपूर्ण असलेले बांधकाम आपण सत्तेत आल्यास अवश्य पूर्ण करू, अशा विविध मुद्यांवर ही निवडणूक रंगणार आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...