Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / माणिकगड कंपनी खिशातील...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

माणिकगड कंपनी खिशातील कामगार युनियनच्या दबंग गिरी चा पर्दाफाश करा..!

माणिकगड कंपनी खिशातील कामगार युनियनच्या दबंग गिरी चा पर्दाफाश करा..!

मारोती डोंगे [तालुका प्रतिनिधि] :  कोरपना तालुक्यातील बहुचर्चित माणिकगड सिमेंट कंपनी नव्याने हस्तांतरित अल्ट्राटेक बिर्ला समूहाच्या गडचांदूर स्थित सिमेंट कंपनी अनेक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे जमीन प्रकरण पाणी रस्ता नियमबाह्य जमीन खरेदी असे अनेक वाद चर्चेत असताना गडचांदूर स्थित माणिकगड सिमेंट कंपनी ने कामगाराच्या मूलभूत अधिकार पायदळी तुडवत स्वतःच्या हाताचे बाहुले बनून काम करणाऱ्या कामगार युनियन यांना चालना देत बि डी  सिंग च्या नेतृत्वात येथील तत्कालीन युनिट हेड राजेंद्र जी काबरा यांच्या मिलीभगत ने अनेक वर्षापासून या ठिकाणी कामगारांचे शोषण होत असताना कामगारांमध्ये सतत फूट पाडून आपल्या सूत्राने चालणाऱ्या सिंग नामक  व्यक्तीच्या नेतृत्वात कामगार युनियन देऊन कामगारांची गळचेपी केल्या जात असल्याचे अनेक तक्रारी व आरोप कामगारांनी केले आहे या ठिकाणी कामगार युनियन प्रमुखाने   अनेक गुन्हेगारी अपराध घडविले अनेक आर्थिक घोटाळे केल्या गेले यावर पडदा पाडण्यासाठी राजेंद्र जी काबरा प्रकरण उघड होऊ नये म्हणून सातत्याने प्रयत्न करून युनियन अध्यक्षाला प्रत्यक्षात मदत करण्याचा विडा उचलला आहे.

कंपनीच्या नियमाने व कामगार धोरणानुसार गेल्या अनेक वर्षापासून वार्षिक सर्वसाधारण सभा झालेल्या नाही कामगार सभेत झालेल्या नियमाची अंमलबजावणी करण्यात आली नाही प्रॉव्हिडंट फंड भविष्य निर्वाह निधी इत्यादीच्या नोंदी व कामगारांच्या हिताचे कोणतेही धोरण राबवले गेले नाही यामुळे कामगारांचे शोषण आर्थिक घोटाळे याठिकाणी करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी असताना सहाय्यक कामगार आयुक्त कामगाराच्या मानव अधिकाराचे खुले आम हनन  केल्या जात असताना कारवाई करण्याकडे दिरंगाई केल्या जात आहे कंपनीचे युनिट हेड राजेंद्र काबरा यांनी यापूर्वी कंपनी निर्मित युनियनच्या अध्यक्षाला हाताशी धरून आदिवासीचे आंदोलन दडपण्यासाठी कामगारांचा वापर केला आदिवासीं कुटुंबाचा छळ दबंग गिरी व भीती निर्माण करण्याचा प्रयत्न कामगारांचा वापर करून करण्यात आला होता शेतकरी व कामगारांच्या संविधानिक अधिकाराची या ठिकाणी अवहेलना केल्या जात आहे कामगाराच्या मूलभूत अधिकारावर गदा आणून भविष्य निर्वाह निधी चा मोठा घोटाळा या ठिकाणी झाला असून यांची पाठराखण करण्याचं काम कंपनी व्यवस्थापन करीत असल्यामुळे कामगारांमध्ये मोठा असंतोष उफाळून आला आहे सहाय्यक कामगार आयुक्त पोलीस प्रशासनाने कामगारांच्या प्रश्नावर गंभीर होऊन चौकशी व कारवाई करावी अन्यथा कामगार आदिवासी शेतकरी जन सत्याग्रह संघटनेच्या वतीने कंपनी गेट पुढे आंदोलन करण्याचा इशारा आबिद अली यांनी दिला आहे कामगारांमध्ये मोठा असंतोष खदखदत असून कामगार युनियन च्या दबंग गिरी चा पर्दाफाश करावा अशी मागणी करण्यात आली आहे

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...