आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडेल इतकी इंदर दरवाढ झाली. आज पेट्रोल 115 रुपये लिटर तर डिझेल 110 रुपये लिटर झाले. घरगुती गॅस दरवाढ सुद्धा 950 रुपये पर्यंत गेला आहे. महाराष्ट्रासह भारतीय जनतेला लुटण्याचे काम नरेंद्र मोदी सरकार करत आहे. गगणाला भिडणारी ही इंधन दरवाढ मोदी सरकारचे पाप आहे. पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल सात रुपये दर कमी करणे म्हणजे लोकांची जखम कुर्तडणे आणि जखमेवर'ची खपली काढण्याचा प्रकार आहे.
80 रुपये पेट्रोल डिझेल दरवाढ झाली म्हणून बोंबलणाऱ्या स्मृती इराणी, हेमा मालिनी, राजनाथ सिंग व नरेंद्र मोदी सध्या कुठेच दिसत नाहीत. कारण यांना सत्तेची मस्ती आणि पदाची सुस्ती चढलेली आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमला हा देश लुटायचा आहे. सर्व शासकीय कंपन्या अदानी अंबानीला विकून या देशात बलाढ्य यंत्रणांच खाजगीकरण करायचं आहे. देशभक्तीचे गाजर दाखवून व 'अच्छे दिना'च्या काळ्या रांगोळ्या काढून हा देश रसातळाला गेला. हे संघी वास्तव आहे. थोडी तरी अर्थतज्ञांकडून अक्कल विकत घेऊन तात्काळ इंधन दरवाढ 50 टक्केच्या वर कमी केली पाहिजे. म्हणून पेट्रोल डिझेलचे दर 50 रुपये लिटर पर्यंत दर कमी केले पाहिजे.
या देशात जीएसटी (GST) चे नवीन कर प्रणाली नरेंद्र मोदी सरकारने आणली. त्याला इंधन अपवाद ठेवले. पेट्रोल, डिझेल, गॅस हे सर्व जीएसटी च्या कक्षा आणावे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. यासाठी नरेंद्र मोदींनी 56 इंचाच्या छाती चा वापर करावा... अशी तमाम भारतीयांच्या वतीने अपेक्षा आहे. पेट्रोल डिझेल जीएसटी कक्षात घेतली तर नक्कीच इंधन दरवाढ कमी होईल आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा होईल आणि राज यांना तसे अधिकार द्यावेत.
केंद्र सरकार अत्यंत करंटे असून कपटी, सूडबुद्धीने वागणारे व अत्यंत नालायक सरकार म्हणून याची इतिहासात नोंद होईल.
सर्वसामान्य माणसाची दिवाळी 'कडू' करणाऱ्या नराधम केंद्र सरकारला तसेच गप्प बसणाऱ्या राज्यातील सर्व आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांना सुद्धा शुभेच्छा देणार नाही... कारण महागाई ने आमचं जगणं मुश्कील झालं आहे.
- संतोष शिंदे,
प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...