वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
भारतीय जनता युवा मोर्चा,भाजपा तालुका/शहर तर्फे मा.राज्यपाल यांना तहसीलदार जिवती तर्फे दिले निवेदन
सय्यद शब्बीर जागीरदार (विशेष प्रतिनिधी जिवती) : ओ.बी.सी.आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित करणाऱ्या भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित करून महाराष्ट्र शासनाने हुकूमशाही केली आहे. महाराष्ट्र सरकारचे हे वर्तन दडपशाहिचे असून केवळ दोनच दिवसांचे अधिवेशन व त्यातही विरोधकांना बोलू न देणे, हे हुकुमशाहिचे धोरण असून या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा चे जिल्हा महामंत्री महेश देवकते,उपाध्यक्ष केशवराव गिरमजी, तालुका महामंत्री दत्ताजी राठोड, तुकाराम वरलावड यांच्या नेतृत्वात तहसीलदार जिवती यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना महेश देवकते म्हणाले की अधिवेशनाच्या नावाने चाललेला हा गोंधळ तमाम महाराष्ट्राचा अपमान असून अश्या प्रकारे सरकार सूडबुद्धीने राजकारण करत असून या सरकारच्या या लोकशाही व ओ.बी.सी.विरोधी धोरणाचा आम्ही तिव्र निषेध करीत असून हे सरकार त्वरित बरखास्त करावे.
अशी मागणी यावेळी उपसभापती महेश देवकते यांनी केली.अन्यथा तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा दिला. यावेळी उपसभापती महेश देवकते यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष केशवराव गिरमजी भाजपा तालुका महामंत्री दत्ता राठोड,भाजप तालुका सचिव तुकाराम वरलावड, भाजपा जिल्हा कार्यकरणी सदस्य गोपीनाथ चव्हाण,सरपंच पुंडलिक गिरमजी,भाजयुमो उपाध्यक्ष संतोष जाधव,भाजयुमो उपाध्यक्ष डॉ.बबन वारे,माधवराव निवळे, नामदेव सलगर,बुध्दाजी मेश्राम, बन्सी जाधव,विठ्ठल चव्हाण, सुनील शेळके,व्यकटी कोतांबे, ईश्वर आडे,विनायक राठोड, अनिल कांशीराम राठोड, मनमंत वारे,बळीराम राठोड, शिवाजी राठोड, अशोक देवकते, सचिन बाबू राठोड, प्रेमसिंग राठोड,प्रफुल मडावी,आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...