Home / महाराष्ट्र / कोरपना व गडचांदूर येथे...

महाराष्ट्र

कोरपना व गडचांदूर येथे महाविकास आघाडीचे उपोषण..

कोरपना व गडचांदूर येथे महाविकास आघाडीचे उपोषण..

 निसार शेख (कोरपना प्रतिनिधी):  आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या तिन काळ्या कृषी कायद्याविरोधात विविध शेतकरी संघटनांच्या भारत बंदच्या समर्थनार्थ एक दिवसीय उपोषण आज (दि. २६ ला) कोरपना येथे तहसील कार्यालयासमोर करण्यात आले. तर गडचांदूर येथे वीर बाबुराव शेडमाके चौकात करण्यात आले.
         केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकारने शेतकरीविरोधी तीन विधेयक लोकशाही आणि संस्थेचे नियम पायदळी तुडवून संसदेत मंजूर करून घेतले. या कायद्यामुळे शेती, शेतकरी व शेतमजूर पूर्णपणे उध्वस्त होणार आहे. तसेच कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधडीला लागणार आहे. त्यामुळे तिन्ही काळे कृषी कायदे रद्द करण्यात यावे यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध शेतकरी संघटनांनी केंद्र सरकार विरोधात पुकारलेल्या भारत बंदच्या समर्थनार्थ एकदिवसीय उपोषण करण्यात आले. 
         यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे, कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल थिपे, नगराध्यक्ष सविता टेकाम, उपाध्यक्ष शरद जोगी, काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष महाडोळे, महिला शहराध्यक्ष अर्चना आंबेकर, कोरपना तालुका सेवादलाचे अध्यक्ष नोगराज मंगरूळकर, कोरपना पंचायत समितीचे माजी सभापती महेंद्र ताकसांडे, माजी सरपंच शिवकुमार राठी, हंसराज चौधरी, दादाजी गोरे, धनंजय गोरे, बांधकाम सभापती कल्पना निमजे, विधानसभा यु. काँग्रेसचे अध्यक्ष आशिष देरकर, अनिल सातपुते, गटनेते विक्रम येरणे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, नगरसेवक राहुल उमरे, अरविंद मेश्राम, श्रीकांत धर्मपुरी, शेख अहमद भाई, अनिल सातपुते, मनोज भोजेकर, विवेक येरणे, रोहित शिंगाडे, आकाश वराठे, रुपेश चुधरी, प्रणय टेकाम, प्रणय ढवळे, विठ्ठल पिदूरकर, केशव डोहे, देविदास मुन यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरपना येथे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे, माजी सभापती श्याम रणदिवे, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे, सिताराम कोडापे, माजी उपसभापती संभा कोवे, कोरपना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनिल बावणे, बाजार समिती कोरपनाचे माजी सभापती भारत चन्ने, नगर परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर चन्ने भाऊराव कारेकर, झिबल जुमनाके, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष इस्माईल शेख, नितीन बावणे, विलास मडावी,  मिलिंद ताकसांडे, निसार शेख, शहर अध्यक्ष अल्पसंख्यक कोरपना जेवराचे उपसरपंच अनिल  गोंडे, उपसरपंच रसूल पटेल, भारत गौरी तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उपोषण करण्यात आले.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...