मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली असून मोदींच्या ह्याच फोटोवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत त्यामुळे सर्विकडे प्रचार जोरदार पद्धतीने सुरू आहे.महाराष्ट्रात देखील प्रचाराचे वारे जोरदार वाहत आहे. या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उतरले असून ठिकठिकाणी मोदींच्या सभा होत आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी (ता. 30 एप्रिल) माळशिरसमध्ये सभा झाली. भाजपच्या निवडणूक स्ट्रॅटेजीनुसार या सभेत मोदींचा पिवळा फेटा बांधून काठी अन् घोंगडं देऊन सत्कार करण्यात आला. माढा लोकसभा मतदारसंघातील धनगर समाजाची निर्णायक मतदारसंख्या डोळ्यासमोर ठेवूनच भाजपने पंतप्रधानांचा धनगरी वेशभूषा देऊन सत्कार केल्याचे उघड वास्तव आहे. परंतु धनगरी वेशभूषेत मोदींचा सत्कार केल्याने समाजामधील नाराजी उफाळून आली आहे. सोशल मीडियावर मोदींचा हाच काठी आणि घोंगडी घातलेला फोटोवर समाजबांधवांनी जोरदार टीका केली आहे.त्याचे कारण आहे धनगर आरक्षण मुद्दा, २०१४ साली सोलापूर येथे सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये देखील अशीच काठी आणि घोंगडी दिले होते त्याप्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की "मै जल्दी धनगर आरक्षण के मुद्दे को लेकर, धनगर समाज को एसटी अनुसूचित जमाती का आरक्षण दूंगा" परंतु दहा वर्षे उलटून गेले तरीही धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे आता मोदींचा पुन्हा असाच सत्कार झाल्याने धनगर समाज संतप्त झाला असून त्यांनी मोदींचा काठी आणि घोंगडी या फोटोवर सोशल मीडियावर टीका करून आरक्षणाचे काय झाले असा सवाल मोदींना केला आहे.त्याच बरोबर धनगरांची फसवणूक केल्याचे अनेकांनी मत मांडले आहे. त्यामुळें माळशिरसमध्ये झालेली मोदींची सभा महायुतीला टोकेदुखी ठरण्याची चिन्ह दिसत आहे.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...
मुंबई : धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणप्रश्नी राज्य शासनाने स्थापन केलेल्या अभ्यासगटाला मध्य प्रदेश,...