Home / महाराष्ट्र / खानदेश / अंनिसने उधळला अंधश्रद्धेचा...

महाराष्ट्र    |    खानदेश

अंनिसने उधळला अंधश्रद्धेचा डाव: उताऱ्यातील कैऱ्यांचा घेतला चवीने आस्वाद

अंनिसने उधळला अंधश्रद्धेचा डाव: उताऱ्यातील कैऱ्यांचा घेतला चवीने आस्वाद

अंनिसने उधळला अंधश्रद्धेचा डाव: उताऱ्यातील कैऱ्यांचा घेतला चवीने आस्वाद

 

नाशिक :

आपल्या किंवा आपल्या कुटुंबावरील संकट दूर व्हावे किंवा इतरांवर ते संकट यावे या किंवा तत्सम हेतूने सात कैऱ्या अन् सात दगडांची रस्त्याच्या कडेला उतारा मांडून अंधश्रद्धा पसरविणाऱ्या अज्ञातांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी डाव उधळला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कैऱ्या या उताऱ्यासाठी नाही तर मानवाचे अन्नच आहे, असा कृतीयुक्त संदेश देण्यासाठी कैऱ्यांचा चवीने आस्वादही घेतला. तसेच परिसरातील नागरिकांना अशाप्रकारच्या कृती या अंधश्रद्धा असून, त्यास कोणीही बळी पडू नये असा संदेशही दिला.

सातपूर, सोमेश्वर कॉलनी परिसरात रस्त्याच्या कडेला चारचाकी पार्किंग केल्या जात असलेल्या जागेवर अज्ञातांनी सात पानांवर सात कैऱ्या अन् सात दगड ठेवून त्यावर हळद-कुंकु टाकलेले होते. तसेच तिथे नवैद्यही ठेवण्यात आला होता. मंगळवारी (दि.१६ मे २०२३) रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी हा सर्व प्रकार केला होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला, तेव्हा परिसरातील नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली व घबराट निर्माण झाली. चारचाकी पार्कींगच्या जागेवर अशाप्रकारे कोणी पूजा केली असावी?, यामागचा नेमका हेतू काय?, करणीचा तर हा प्रकार नसावा ना? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांमध्ये विशेषत: महिला वर्गात चर्चिले गेले. काहींनी तर हा जादूटोणाचा प्रकार असावा असाही संशय व्यक्त केला. आश्चर्याची बाब म्हणजे नागरिकांनी याठिकाणी दहशतीपोटी वाहने पार्किंग करणेही टाळले. यासर्व प्रकाराचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडे धाव घेतली. समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, जिल्हा पदाधिकारी महेंद्र दातरंगे, कोमल वर्दे, यशदा चांदगुडे यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी परिसरातील नागरिकांना बोलावून त्यांचे प्रबोधन केले. अशाप्रकारच्या उताऱ्यामुळे समाजात अंधश्रद्धा पसरत असून, यातून काहीही साध्य होत नसल्याची बाब अंनिसच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना पटवून दिली. तसेच उताऱ्यात मांडलेल्या कैऱ्या धुवून त्याचा आस्वादही घेतला. तसेच नागरिकांनी अशाप्रकारच्या पूजांमुळे घाबरून जावू नये, परिसरात अंधश्रद्धाचा प्रकार घडत असेल तर अंनिसशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. दरम्यान, अशाप्रकारची पूजा करून भितीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांचा परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे.

---

यशदाचे कौतुक

अंनिसच्या कार्यकर्त्यांमध्ये लहानग्या यशदाचे मात्र सर्वांनीच कौतुक केले. यशदाने मनात कुठलीही भिती न बाळगता पूजेतील कैऱ्या उचलल्या. तसेच त्यांचा आस्वादही घेतला. अशाप्रकारच्या उताऱ्यामुळे विघ्न दूर होणे किंवा इतरांना त्यापासून ईजा पोहोचणे ही निव्वळ अंधश्रद्धा असल्याचा संदेशही तिने यावेळी दिला. तिची ही धाडसी वृत्ती कौतुकास्पद ठरली.

ताज्या बातम्या

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे*    *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल*    *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.* 30 October, 2024

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.*

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक...

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल. 30 October, 2024

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल.

वणी:- वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाघमारे यांनी वणी तालुका अध्यक्ष पदी हरीश पाते यांची काही महिन्यां अगोदर निवड...

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट 30 October, 2024

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट

वणी :मुकुटबन परिसरातील सामाजीक व शैक्षणीक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारी सहयोग ग्रुप मुकुटबन द्वारा बाजीराव महाराज...

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज 30 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झालीआहे.संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा...

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला*    *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज*    *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा* 30 October, 2024

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज* *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा*

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन...

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन. 29 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन.

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झाली संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा निवडणुकीच्या...

खानदेशतील बातम्या

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) राष्ट्रपतींना निवेदन...*

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा)...

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी निवड*

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या...