Home / महाराष्ट्र / कोकण / महात्मा फुले यांचे...

महाराष्ट्र    |    कोकण

महात्मा फुले यांचे विचार समजून घेणे आज काळाची गरज ..!

महात्मा फुले यांचे विचार समजून घेणे आज काळाची गरज ..!

भारतीय वार्ता :

 

            विद्येविना मती गेली

             मतीविना निती गेली

             नितीविना गती गेली

             गती विना वित्त गेले

    एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले..

असा शिक्षणाचा संदेश देणारे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना १९६ व्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन..! ????

      शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर जगणं व त्यांचे विचार आत्मसात करून ते कृतीत उतरवणं म्हणजेच पुरोगामी असणं आहे असे मला वाटते. महात्मा फुले यांच्या विचारांचे वारसदार होणे म्हणजे कृतीशील सुधारक होणे होय.

विचार मांडणे/ लिहिणे व ते आपल्या व्यक्तिगत जीवनात अंमलात आणणे यात फरक आहे. आज

अनेक लोक आपल्याच महापुरूषांचा गरजेपुरता वापर करताना दिसतात ही चिंतेची गोष्ट आहे. मग जेव्हा विषय येतो पुरोगामी चळवळी नामशेष होताहेत का? त्याची कारणे काय ? तेव्हा त्याचे उत्तर हे आपणच असतो. चळवळीत काम करतो असे म्हणणारेच संत तुकारामांच्या भाषेत दांभिकपणे वागत आहेत असे अनेकदा दिसते.

   आपला इतिहास आपण समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही पण तो समजून घेतल्यावर त्यात आजच्या परिस्थितीत आपण काय बदल करायला हवेत ते समजून घेणे व ते कृतीत आणणे म्हणजे परिवर्तन होय. पण ते प्रत्यक्ष कृतीत आणायला मात्र आपलेच अनेकजण मागे राहातात किंवा घाबरतात. आपला धार्मिक रेटा व हिंदुत्ववादी रेटा इतका प्रखर आहे की तेथे आपले काय वाईट होईल ही रिस्क नको म्हणून अनेक धार्मिक व पारंपारिक गोष्टी आपण करत रहातो. मग प्रश्न असा येतो की आपण नेमके महात्मा फुले यांचे विचार काय समजून घेतलेय..?  त्यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचावी म्हणून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत समाजाच्या विरोधात जाऊन प्रसंगी घर सोडून सावित्रीबाईला शिकवले. मुली शिकल्या तर घर, कुटुंब सुधारेल हे लक्षात घेतले व सर्वांच्या ते आणून दिले. पुढे सावित्रीबाईंनी ‘शिक्षणाने पशुत्व हटते पहा’ अशी अनेक काव्यफुले आपल्या ओंजळीत घातली. इंग्रजीचे महत्व सांगितले. ती आपली विद्येची देवता झाली. ती घराबाहेर पडली म्हणून आज आपण एक मुक्त व मोकळा श्वास घेत आहोत. दोघां उभयतांचे आपल्या एकूणच स्त्री जातीवर अनंत उपकार आहेत. तरीही आजही आपण न पाहिलेल्या सरस्वतीचे पूजन करण्यात गुंतलो आहोत. हे वास्तव नाकारतां येत नाही. अनेक शाळा व महाविद्यालयात आजही सरस्वती पूजन केले जाते. ते ज्यांना करायचे ते जरूर करा. पण त्यासोबत सावित्रीची आठवण काढा. तिच्यामुळे आज आपण सर्व क्षेत्रात एक उंच भरारी घेत आहोत याची जाणीव ठेवा. आपला शिक्षित समाज आजही मानसिक गुलामीत का जगत आहे याचे आश्चर्य वाटते. महात्मा फुले यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म अशी अनेक पुस्तके लिहून आपल्याला सतत जागे करायचा व आपले प्रश्न मांडायचा प्रयत्न केला आहे. पण आजही आपण त्यावाटेला का जात नाही.? त्यांनी लिहिलेले व त्यांच्यावर अनेकांनी लिहिलेले आपण का वाचत नाही.? सर्व बहुजनांसाठी यांनी आपले आयुष्य वेचले व विशेषतः ब्राह्मण महिलांसाठी त्यांना अन्याय व अत्याचारातून बाहेर काढण्यासाठी प्रचंड काम केले तरीही ते आपले का नाही होऊ शकत ? या महापुरूषांना जातीत का बंदिस्त केले जातेय.? यामागचे षडयंत्र समजून घेऊन आपण पुढे जायला हवे.

     बहुजनांसाठी तर त्यांनी प्रचंड काम केले पण ब्राह्मण विधवा महिला/ उपेक्षित/ गरजू/ फसलेल्या महिला यांनाही त्यांना प्रचंड आधार दिला. आपल्या घरी त्यांची बाळंतपणे केली. मुलं सांभाळली. बालविधवांचे केशवपन थांबावे व ती प्रथा बंद व्हावी म्हणून पहिला न्हाव्यांचा संप त्यांनी घडवून आणला. हे का विसरायला भाग पाडले जातेय.? तर त्यांनी सनातन्यांविरूध्द सतत बंड पुकारले. मनुवादावर सतत बोलले. इतकेच नव्हे तर अगदी भगवतगीता व संत ज्ञानेश्वरीतील काही ओव्यांची त्यांनी चिकित्सा केली. वर्णवर्चस्ववादावर काही संत का बोलले नाहीत म्हणूनही त्यांनी प्रश्न निर्माण केले. हिंदू धर्मात जन्म होऊनही त्यांनी धर्मातील अनिष्ट चालीरिती व रूढी परंपरांवर भाष्य केले. धर्माची चिकित्सा केली. त्यांचे परखड व स्पष्ट विचारांमुळे सनातनी व्यवस्थेचा पाया डळमळीत झाला व ती होण्याची सततची भीती यामुळे फुले आजही पटत नाहीत व पचतही नाहीत हे वास्तव नाकारतां येत नाही. त्यामुळेच आजही राज्यपालांसारखे उच्चपदस्थ लोकही यांना नाकारतांना दिसतात. जातवास्तव, वर्णव्यवस्था व वर्गव्यवस्था आजही जीवंत ठेवायचा प्रयत्न सुरू आहे. तेव्हा आपण सावध होऊन आपल्याला बदलण्याची व जागृत होण्याची गरज आहे.

      महापुरूषांचे पूजन करून त्यांना अभिवादन करणे अशीच त्यांची जयंती केवळ साजरी करता कामा नये तर त्यांचे विचार समजून घेऊन आपण प्रवाही होणे, कृतीशील होणे म्हणजे जयंती साजरी होणे होय..!!

 

ॲड. शैलजा मोळक

अध्यक्ष,  शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे

लेखन व सामाजिक कार्य

मो. 9823627244

ताज्या बातम्या

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे*    *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल*    *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.* 30 October, 2024

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.*

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक...

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल. 30 October, 2024

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल.

वणी:- वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाघमारे यांनी वणी तालुका अध्यक्ष पदी हरीश पाते यांची काही महिन्यां अगोदर निवड...

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट 30 October, 2024

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट

वणी :मुकुटबन परिसरातील सामाजीक व शैक्षणीक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारी सहयोग ग्रुप मुकुटबन द्वारा बाजीराव महाराज...

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज 30 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झालीआहे.संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा...

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला*    *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज*    *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा* 30 October, 2024

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज* *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा*

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन...

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन. 29 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन.

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झाली संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा निवडणुकीच्या...

कोकणतील बातम्या

महिलांनी शैक्षणिक प्रवाहात यावे-प्रवीण काकडे

रत्नागिरी:महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी...

*जितके पॅनिक व्हाल तितके सायबर फ्रॉड मध्ये अडकत जाल - अॅड. चैतन्य भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....

*ऑनलाईन गेम चा सापळा धोका वेळीच ओळखा - अॅड. चैतन्य एम. भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....