भारतीय वार्ता
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
करमाळा: बाळंतपणासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णाला सक्षम यंत्रणा असून तज्ञ डॉक्टर व भूलतज्ञ उपलब्ध असून अत्यंत काळजीपूर्वक या सर्व प्रसूती केल्या जात असून रुग्णांनी याचा फायदा घ्यावा असे आव्हान डॉक्टर स्मिता बंडगर यांनी केले.
करमाळा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात गतवर्षी सातशे प्रसूती झाली असून पैकी फक्त 180 महिलांना सिजरिंग करण्याची वेळ आली बाकी सर्व नॉर्मल पद्धतीने बाळंतीण झाल्या. डॉक्टर स्मिता बंडगर या करमाळा उपजिल्हा रुग्णालयात कार्य झाल्यापासून एक आदर्श डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. जास्तीत जास्त नॉर्मल प्रसूती करण्यावर त्यांचा भर असून त्यांच्या या कामाबद्दल शिवसेनेच्या वतीने आज त्यांचा सत्कार जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर, युवा सेनेचे तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, शहर प्रमुख विशाल गायकवाड, शाखाप्रमुख मारुती भोसले, वैद्यकीय सहाय्यक नागेश चेंडगे, वैद्यकीय कक्ष प्रमुख रोहित वायबसे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन गुंजकर, डॉक्टर भोसले, सुखदेव लष्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टरांना साहित्य वेळेवर मदत करणाऱ्या परिचारिका शिंदे व ऑपरेशन झालेल्या पेशंटला सुविधा देणाऱ्या परिचारिका थोरात तसेच डॉक्टर सुजित पाटील हे भुलतज्ञ म्हणून अहोरात्र उपजिल्हा रुग्णालयात सेवा देत असल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला.
करमाळ्यात सध्या नॉर्मल डिलिव्हरी करण्याऐवजी सिजरिंग करून पैसे कमवण्याचा उद्योग वाढला आहे. सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत.
एका नॉर्मल डिलिव्हरी साठी 25000 रुपये सिजरिंग साठी 60 ते 70 हजार रुपये मोजावे लागतात मात्र हीच रुग्णसेवा उपजिल्हा रुग्णालयात मोफत मिळत आहे. संवेदनशील डॉक्टर स्मिता बंडगर या हजर झाल्यामुळे अनेक रुग्णांना त्याचा फायदा होत आहे.
यावेळी बोलताना डॉक्टरस्मिता बंडगर म्हणाले की शासकीय रुग्णालयात चांगल्या सेवा मिळत नाही असा अपप्रचार झाल्यामुळे आवश्यकता असताना सुद्धा रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत नाहीत.
शासकीय रुग्णालयात सुद्धा दर्जेदार उपचार दिले जातात. गेल्या वर्षभरात सातशे प्रसूतीपैकी 520 नॉर्मल डिलिव्हरी झाले आहे तर 180 महिलांना सिजरिंग करावे लागले व सर्व महिला सुरक्षित आहेत. शासकीय रुग्णालय दाखल झाल्यानंतर शासनाच्या सर्व योजनेचा फायदा संबंधित रूग्णाला मिळतो.
यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवेत प्रचंड बदल होत आहेत. करमाळा उपजिल्हा रुग्णालयात सर्व सोयी चांगल्या दर्जाच्या देण्यासाठी डॉक्टरांना सूचना देण्यात आलेल्या असून शिवसेनेचे या सर्व प्रकाराकडे लक्ष आहे.
डॉक्टर स्मिता बंडगर व डॉक्टर सुजित पाटील असे समाजाची जाण असलेले व गोरगरिबाची जाणीव असलेले डॉक्टर उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यामुळे सेवा चांगली मिळत आहे
खाजगी रुग्णालयात नाही त्याच्यापेक्षा चांगली सोय उपजिल्हा रुग्णालयात आहे यामुळे सरकारी दवाखाने चांगले उपचार करत नाही ही भावना मनातून काढून टाकावी व सर्वांनी उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या सोयीचा फायदा घ्यावा या ठिकाणी काही आडूनच झाल्यास त्यांनी शिवसेना कार्यालयाचे संपर्क साधावा अशी आवाहन केले.
या जन्मलेल्या बाळांपैकी 376 बाळ पुरुष जातीचे तर 320 बालके स्त्री जातीचे जन्मले आहेत अशी आवाहन केले.
या जन्मलेल्या बाळांपैकी 376 बाळ पुरुष जातीचे तर 320 बालके स्त्री जातीचे जन्मले आहेत