Home / महाराष्ट्र / देशी दारू व बार तात्काळ...

महाराष्ट्र

देशी दारू व बार तात्काळ हटवा अन्यथा परिणामाला तयार राहा भिम टायगर सेनेचा जिल्हाधिकार्‍यांना इशारा वेळ पडली तर भिम टायगर सेना हायकोर्टा मध्ये जाणार

देशी दारू व बार तात्काळ हटवा अन्यथा परिणामाला  तयार राहा भिम टायगर सेनेचा जिल्हाधिकार्‍यांना इशारा    वेळ पडली तर भिम टायगर सेना हायकोर्टा मध्ये जाणार

देशी दारू व बार तात्काळ हटवा अन्यथा परिणामाला

तयार राहा भिम टायगर सेनेचा जिल्हाधिकार्‍यांना इशारा

 

वेळ पडली तर भिम टायगर सेना हायकोर्टा मध्ये जाणार

 

✍️उमेश इंगळे

नांदेड प्रतिनिधी

 

नांदेड:-प्रती,

जिल्हाधिकारी साहेब

जिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड

विषय: नांदेड शहरातील डॉ. बाबासाहेब,छ.शिवाजी महाराज साहीत्यसम्राट अन्नाभाउ साठे इ. महापुरुषांच्या पुतळ्या समोर असलेले देशी दारू,बियर बारच्या दुकानाचे परवाने तात्काळ रद्द करणे  बाबत

महोदय:

      वरील विषयी आपणास तक्रार अर्ज देण्यात येतो की दि.15 मार्च 2023 पासून बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी मनीषभाऊ कावळे यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन जवळ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषा समोरील देशी दारू व बिअर बारचे दुकाने तात्काळ हटविण्यात यावे या संदर्भात धरणे आंदोलन चालू असून सदर आंदोलनास भीम टायगर सेना या क्रांतिकारी संघटनेने जाहीर पाठिंबा दिलेला आहे.भविष्यात 1 ) सदरील आंदोलन चिघळु नये 2 ) कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये 3 ) भीम टायगर सेना ह्या संघटनेला रस्त्यावर उतरण्याची पाळी येउ नये 4 ) सदर आंदोलनास अनुसरून हे आंदोलन कसे संविधानीक आहे यासाठी आपणास तक्रार अर्ज देण्यात येत आहे.नांदेड शहरातील भारतीय घटनेचे शिल्प कार डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज,साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे,इ.महा पुरुषांच्या पुतळ्या समोरील देशी दारू व बियर बारचे शासन मान्य दुकाने तात्काळ हटविण्यात यावे. याचे कारण असे की वरील दुकानाला शासनाने परवानगी जरी दिली असली तरी भारतीय संविधान भाग 3 मुलभूत हक्का मध्ये अनुच्छेद 19 (6) नुसार एखादा व्यवसाय करणे हा जरी मूलभूत अधिकार असला तरी व्यवसायाचा अधिकार बजावत असताना संविधानाने काही अटी घातलेल्या आहेत त्या अटी अश्या सदरील व्यवसाय उभा करत असताना

1) लोकांचे आरोग्य

2) कायदा व सुव्यवस्था

3 ) नैतिकता धोक्यात येता कामा नये.असे आपले भारतीय संविधान सांगत असताना मा. जिल्हाधिकारी साहेब मला आपल्याला विचारायचे आहे

A ) नशेली पदार्थ प्राशन केल्यानंतर लोकांच्या आरोग्य धोक्यात येते किंवा नाही

B ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषा समोर देशी दारू/बारला परवानगी दिल्या मुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो की नाही

C ) ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय संविधान दिले असून त्यांनी आयुष्यभर दारूच्या थेंबालाही हात लावला नाही.ज्याने आयुष्यभर नैतिकता जोपासली अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या पुतळ्या समोर देशी दारू व बिअर बारच्या दुकानला परवानगी देणे नैतिकते मध्ये बसते काय ? याचे उत्तरही आपण आम्हाला लेखी द्यावे. कारण संविधाना मध्ये नैतिकतेला फार महत्त्व आहे.तसेच 24 एप्रिल 1973 मध्ये केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस.एम.सिक्री व त्यांच्या ते 13

जजच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयात म्हटले आहे की की आर्टिकल 12 ते 35 हे मुलभूत संरचणेचा ( Basic Structure) भाग आहे.त्यामुळे मुलभूत संरचणेला तडा जाईल असे कायदे करता येणार नाही. कारण अनुच्छेद 19 (6) हे मुलभूत संरचणेचा भाग त्यामुळे त्यामुळे देशी दारू व बियर बारला परवानगी देऊन सुप्रीम कोर्टाचा अवमान झाला असे तुम्हाला वाटत नाही का ? तेही आम्हाला लेखी द्यावे.तसेच भारतीय संविधान भाग 4 राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे अनुच्छेद 47 नुसार जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे व नशेली पदार्था वर बंदी आणणे हे राज्य शासनाचे कर्तव्य आहे.आपण राज्य शासनाचे प्रतिनिधी असल्यामुळे आपण देशी दारू व बियर बार चा परवाना रद्द किंवा स्थलांतरित करून किंवा संबंधित विभागाला आदेश किंवा शिफारस करुन आपण संविधानीक कर्तव्य पार पाडु शकत  नाही का? हे आम्हास लेखी सांगावे. भारतीय संविधान भाग 4 मूलभूत कर्तव्यामध्ये अनुच्छेद 51,B मध्ये  मध्ये राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्मृती मिळाली त्या आदर्श श्रेष्ठ व आदरणीय महापुरुषाचे जोपासना करून त्याचे अनुसरून करणे हे आपले कर्तव्य सांगितले असताना आपण कर्तव्यापासून दूर जात आहोत हे आपणास वाटत नाही का ? आपल्या आदर्श व्यक्तीविषयी कोणत्याही वस्तू किंवा साधनाद्वारे विटंबना करणे करणे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम 3 (1) v नुसार गुन्हा असून संबंधित देशी दारू व बियर बार मालकावर दाखल करण्यास मा.जिल्हाधिकारी,नांदेड यांनी स्वतः किंवा तुमच्या कनिष्ठा मार्फत पोलीस प्रशासनास लेखी तक्रार अर्ज द्यावा. तसेच राज्य शासनाने महाराष्ट्रातील सर्व जिल्हे,तालुके,गाव पातळी वरील महापुरुषांचे पुतळे व धार्मिक स्थळा समोरील असलेले देशी दारू व बिअर बारचे तात्काळ लायसन रद्द करावे किंवा इतर स्थलांतरित करावे. मा‌.जिल्हाधिकारी साहेब वरील महापुरुषा समोरील देशी व बियर बारला दिलेल्या परवानग्या हे कश्या संविधानान विरोधी आहेत हे मी आपल्याला संदर्भा सहित लेखी दिलेले आहेत.त्यामुळे आपण सदर घटनेचे गांभीर्य व येणार्या भीम जयंती चे महत्व लक्षात घेऊन भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये / जिवीत हानी होऊ नये म्हणून आपण आपल्या अधिकाराचा तात्काळ वापर करून आपण स्वतः परवाने रद्द करण्या संदर्भात कार्यवाही करावी किंवा संबंधित विभागाला आदेश /सुचणा करून तात्काळ कारवाई करून आपण संविधानीक कर्तव्य पार पाडावे.अन्यथा भिम टायगर सेना आपणास रितसर निवेदन देऊन संविधानिक मार्गाने आंदोलन करेल सदर आंदोलन करत असताना कायदा सुव्यवस्था निर्माण झाल्यास किंवा जिवीत हानी झाल्यास आपण स्वतः जवाबदार राहशाल याची नोंद घ्यावी

               @ अर्जदार @

समस्त भीम टायगर सेना नांदेड जिल्हा व शहर शाखा

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...