Home / महाराष्ट्र / कोकण / सायबरमधील नवीन फ्रॉड...

महाराष्ट्र    |    कोकण

सायबरमधील नवीन फ्रॉड पाच कोटींचा घोटाळा उघड ! अॅड. चैतन्य भंडारी

सायबरमधील नवीन फ्रॉड  पाच कोटींचा घोटाळा उघड !  अॅड. चैतन्य भंडारी

भारतीय वार्ता 

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७

 

पुणे: नवीन स्टार्ट अप सुरु करणारी अनेक मंडळी आपल्या देशात आहेत. विशेषतः तरुण मंडळींना काहीतरी उद्योग व्यवसाय करायची इच्छा जास्त असते. मात्र स्वतःचे एखादे प्रॉडक्ट घेऊन मार्केटमध्ये जाण्यात रिस्क असते. त्या ऐवजी ऑलरेडी मार्केटमध्ये जे ब्रँड प्रस्थापित आहेत त्यांच्या फ्रॅन्चाइसी घेणे तुलनेने कमी रिस्क व जास्त फायद्याचे ठरते. अगदी येवले चहा पासून ते थेट एमजी मोटर्स पर्यंत आणि बर्गर किंग पासून डॉमिनोज पर्यंत ! यांची उत्पादने हातोहात खपतात हे सगळ्यांना माहित आहे त्यामुळेच यांच्या फ्रॅन्चाइसी घेण्यात हे नवीन स्टार्ट अप वाले जास्त उत्साही असतात.

 

मात्र नेमकं हेच ओळखून काही हॅकर्स मंडळींनी जाळे विणून पद्धतशीरपणे या तरुणाईला अडकवले असून प्राथमिक तपासात किमान पाच कोटी रुपये लुटल्याचे पोलिसांना आढळले आहे. हि सायबर फ्रॉड करणारी टोळी पोलिसांनी पकडली असून त्यां हॅकर्स नि अजून किती लोकांना लुटलं आहे याचा शोध सुरु आहे. संपूर्ण भारतातून लुटल्याची उदाहरणे समोर आली आहेत. या टोळीची लुटण्याची पद्धत कशी आहे ?

तर मार्केटमधील नामांकित कंपन्यांच्या डुप्लिकेट वेबसाईट यांनी बनवल्या. मात्र त्या कंपन्यांच्या वेबसाईट ऑलरेडी आधीच असल्याने याना त्याचे डोमेन नेम / लिंक ऍड्रेस मिळू शकत नाही तेव्हा यांनी त्यात किंचित बदल करून नाव मिळवले अन वेबसाईट सुरु केल्या. वेबसाईट मात्र अगदी ओरिजिनल सारख्या हुबेहूब केल्यात. कि ज्याचा भल्याभल्याना संशय येऊ नये. ग्रामीण भागात अजूनही पहा निरमा / लाईफ बॉय इत्यादी साबणाच्या नावात किंचित बदल करून डुप्लिकेट साबणे विक्रीस येतात.... तसेच हे आता वेबसाईट डुप्लिकेट प्रकरण आहे !

आणि हि टोळी मग त्या मूळ कंपनीच्या वेबसाईटवरून विविध अपडेट घेत राहायची. आणि मग जेव्हा कधी त्या कंपन्यांनी फ्रॅन्चाइसी देणे आहे या प्रकारचे निवेदन त्यांच्या साईटवरून केले की हि टोळी ती संधी घ्यायची आणि त्यांच्या (डुप्लिकेट) साईटवरून तेच आवाहन करायची. ज्या लोकांना हि साईट डुप्लिकेट आहे हे कळलं नाही ते लोक नकळत यांच्या जाळ्यात अडकले आणि फ्रॅन्चाइसी हवी असं म्हणत बुकिंग अमाऊंट (या टोळीला) देऊन मोकळे झाले. त्या डुप्लिकेट वेबसाईट वर जो कॉन्टॅक्ट नम्बर दिला जायचा तोही नंतर बंद करून टाकला जायचा किंवा बदलून दुसरेच सिम कार्ड असलेला नम्बर तिथं टाकून पुन्हा नव्याने लूटमार सुरु ! असं होत सगळं ! आता जी टोळी पकडली आहे व एकूण यात जी रक्कम कळतेय तो खरेतर हिमनगाचा वरचा भाग आहे अजून तपास सुरु असून तो आकडा अजून वाढू शकतो. तर मंडळी तुम्हीही सावध राहा. असं कुणाला कुणाची जरी फ्रॅन्चाइसी घ्यायची असली तरी त्या कंपनीच्या अधिकृत असण्याबद्दल आधी खात्री करून घ्या. वाटलं तर त्या कंपनीच्या जवळच्या आउटलेट मध्ये स्वतः फिजिकली जाऊन नीट चौकशी करा मगच फ्रॅन्चाइसी घेण्याची बुकिंग अमाऊंट भरा. ऑनलाईन मध्ये फसवणुकीचे प्रकार वरचेवर वाढत आहेत. अशावेळी शक्यतो पैसे भरण्यापूर्वी फिजिकली त्या कंपनीच्या कार्यालयात जाऊन समक्ष सगळी चौकशी करून मगच पैसे भरा. घरबसल्या ऑनलाईन भरण्याच्या नादी न लागणे सर्वोत्तम, कारण वेबसाईट अस्सल आहे की डुप्लिकेट हे सहसा सामान्य लोकांना पटकन ओळखू येत  नाही.  हेच ओळखून अशा प्रकारचे फ्रॉड केले जात आहेत.

तेव्हा स्वतः सावध व्हा आणि इतरांनाही सावध करा तुम्ही सुरक्षित राहता असे आवाहन सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष व ख्यातनाम सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी , धनंजय देशपांडे,पुणे यांनी तमाम नागरीकांना व जनतेला केले आहे.

ताज्या बातम्या

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे*    *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल*    *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.* 30 October, 2024

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.*

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक...

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल. 30 October, 2024

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल.

वणी:- वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाघमारे यांनी वणी तालुका अध्यक्ष पदी हरीश पाते यांची काही महिन्यां अगोदर निवड...

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट 30 October, 2024

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट

वणी :मुकुटबन परिसरातील सामाजीक व शैक्षणीक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारी सहयोग ग्रुप मुकुटबन द्वारा बाजीराव महाराज...

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज 30 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झालीआहे.संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा...

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला*    *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज*    *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा* 30 October, 2024

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज* *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा*

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन...

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन. 29 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन.

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झाली संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा निवडणुकीच्या...

कोकणतील बातम्या

महिलांनी शैक्षणिक प्रवाहात यावे-प्रवीण काकडे

रत्नागिरी:महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी...

*जितके पॅनिक व्हाल तितके सायबर फ्रॉड मध्ये अडकत जाल - अॅड. चैतन्य भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....

*ऑनलाईन गेम चा सापळा धोका वेळीच ओळखा - अॅड. चैतन्य एम. भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....