Home / महाराष्ट्र / खानदेश / जागतील चिमणी दिवस रद्द...

महाराष्ट्र    |    खानदेश

जागतील चिमणी दिवस रद्द करा! पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे

  जागतील चिमणी दिवस रद्द करा! पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे

भारतीय वार्ता 

 

 

गेल्या शतकात सतत कमी होणारी पक्षी संख्या आणि विलुप्तीच्या मार्गांवरील अचानक गायब झालेली चिमणी या विषयी जनजागृती करण्यासाठी गेल्या 14 वर्षा पासून 20 मार्च ला जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात येतो.हा जागतिक चिमणी दिवस तात्काळ बंद करण्याची मागणी पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे काही वर्षा पासून करत आहेत.या विषयी पक्षी संशोधक पुढे बोलतात चिमण्यांची संख्या घटण्याचे अनेक कारण परंपरागत ज्ञानाच्या आधारावर सांगण्यात येतात जसे कि कमी होणारे जंगल तसेंच वेगाने वाढणारे शहरीकरण,मोबाईल टॉवर त्यातील रेडि्येशन, ध्वनी प्रदूषण, लाईट प्रदूषण, इत्यादी.पक्षी संशोधक खंत व्यक्त करतात कि चिमणी संपत आहे हे दर्शवण्यासाठी चुकुचे निरीक्षण नोंदवले गेले.जसे कि चिमण्याच्या संख्ये विषयी बोलायचे झालेच तर खूप चुकीचे निरीक्षण किंवा अधुरे निरीक्षण नोंदवले गेले आहेत उदा. लखनउ मध्ये 2015 च्या पक्षी गणनेत 5692 चिमण्याची नोंद घेण्यात आली आणि 775 चिमणी थवे विविध ठिकाणी नोंदणी गेली,2017 मध्ये तिरुअनंतपुरम येथे फक्त 29 चिमण्या नोंदवल्यात, चिमण्यांची संख्या आंध्र प्रदेश मध्ये 80 % तसेच 20 % राजस्थान, गुजरात, केरळ येथे कमी झाली आहे.ही आकडेवारी भारतीय कृषी संशोधन परिषदने नोंदवी आहे.या प्रवृत्ती मुळे पंजाब मध्ये चिमणी विलुप्त होण्याच्या मार्गांवर आहे अशी नोंदणी केली गेली.लाखो जीवित प्रजाती मधील मानव ही एक प्रजाती आहे,विधात्याच्या या जीवनसृष्टी मध्ये माणूस मालक बनू पाहत आहे.काही लोकांची पाशवीप्रवृत्ती निसर्गात जे आहे ते माझ्या प्रयत्नमुळे आहे हे दर्शवाण्यात सार्थकता मानतात.या विषयी पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे सांगतात उन्हाळा आला कि चिमान्यांना दाना-पाणी करणाऱ्यांची संख्या अचानक वाढते, पण त्यांच्या याच कृती मुळे मानवी दानापाण्यावर ऐतखाऊ निसर्गासाठी घातक अशा नवीन पक्षी प्रजातीचा उगम होतो आणि अशा पक्षांना त्यांच्या मते आकाशातील उंदीर म्हणणे योग्य असेल.निसर्गातील उत्कृष्ट अभियंता चिमणी आहे जी घरटे कुठल्याही शैक्षणिक पात्रते शिवाय नितांत स्वर्गीय या स्वरूपाचे घरटे बांधते पण काही लोकांना, पक्षांच्या जीवन जगण्याच्या क्षमते वर शंका आहे, त्यामुळेच मानव निर्मित घरटे लावण्याची सुरुवात झाली आहे.पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे त्यांच्या संशोधन कार्याबद्दल सांगतात कि जागतिक स्तरावर पक्षी जगत पुर्ण पणे बदले आहे,  शेकडो वर्ष पूर्वीची नैसर्गिक जीवनशैली वर आधारित पक्षी संवर्धन भारतात होत आहे, त्यामुळे पक्षी जगतातील झालेल्या बदला विषयी अभ्यास न करता पारंपरिक पद्धतीने पक्षी संवर्धन सुरु आहे आणि त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडतं आहे.भाकडं ज्ञानावर आधारित जागतिक चिमणी दिवस साजरा करणारे स्वयम घोषित पक्षी रखवाले एकमेकांचे कार्य किती महान आहे हे दर्शवण्यासाठी हा दिवस मुख्य उद्देशाने वापरतात.पण पक्षी संशोधन केंद्र यांच्या संशोधनात चिमण्यांची संख्या सुस्थितीत नोंदवली गेली. खरं पाहता कितीही लहान जिल्हा असेल तरी 5 अंकी चिमणी अधिवास किमान आहेत.चिमण्या संपल्या नाहीत तर त्यांनी फक्त अधिवास बदला आहे.चुकीची आकडेवारी दाखवून जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात येतो.यात कुठल्याही वैज्ञानिक विचाराने चिमणी संवर्धन केले जात नाही, त्यामुळे जागतिक चिमणी दिवस तात्काळ रद्द करावा या साठी पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे पर्यावरण मंत्रालयात सतत पाठपुरावाठा करत आहेत.

 

एकमेव आधुनिक पक्षी संशोधक

सूर्यकांत खंदारे

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

खानदेशतील बातम्या

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) राष्ट्रपतींना निवेदन...*

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा)...

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी निवड*

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या...