मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
✍️ उत्तम माने
मो.नंः 8484878818
लातूर: - चाकूर तालूक्यातील चापोली येथील ग्रा पं मालकीची 244गटातील 36 आर जमीन व सर्वे नंबर 69 मधील 1हेक्टर 40 आर जमीनीवरील नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ चापोली यांचे झालेले अनाधिकृत नियमबाह्य अतीक्रमन काढून मोजणी करून जमीन ग्रा पं व शासनाच्या ताब्यात घेण्यात यावी अन्यथा या मागणीसाठी जिल्हा अधिकारी जिल्हा परिषद लातूर कार्यालया समोर दि 27/02/2023 पासून बेमुदत अमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन आज रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) च्या वतीने जिल्हा अध्यक्ष मा मेघराज रामलिंग जेवळीकर यांच्या सहीने प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
चापोली ता. चाकूर जि. लातूर येथील ग्रा पं मालकीची सर्वे नंबर 69 मधील गट नंबर 244मध्ये जमीन आहे मात्र काही वर्षा पासून या जमीनीवर व या जमीनीस जाण्या येण्यासाठी असणार्या अधिकृत रस्त्यावर ही नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ चापोली यांनी नियमबाह्य अतिक्रमण करून यावर इमारती बांधकाम व इतर वापरासाठी अनाधिकृत कब्जा केला आहे. या साठी कित्येक वर्षा पासून अतीक्रमन काढण्यासाठी अनेक तोंडी, आंदोलने, लेखी तक्रारी सर्व संबधीतांना करूनही आज पर्यंत येथील अतिक्रमण ग्रा पं ने, व संबंधित कार्यालय यांनी जाणीवपूर्वक आज पर्यंत काढलेले नाही. याबाबत कुठे पाणी मुरतय कळत नाही.
तसेच चापोली येथे सकस आहार योजनेची शासनाची सर्वे नंबर 69 मध्ये 1हेक्टर 40 जागा ही आहे ती योजना बंद पडल्यास शासनाने ती जमीन परत मागणी केली मात्र या जमीनीवर गेल्या 20 ते 25 वर्षापासून बाजूस असलेल्या नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ चापोली यांनी अनाधिकृत नियमबाह्य अतिक्रमण करून तीथे इमारतीचे नियमबाह्य बांधकाम करून अतिक्रमण केले आहे या बाबतही येथील अतिक्रमण काढून जमीन शासनाच्या ताब्यात घेणे बाबत गावातून अनेकदा तोंडी, लेखी तक्रारी ग्रा पं, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आयुक्त कार्यालय औरंगाबाद, मंत्रालय मुंबई येथे करण्यात आल्या मात्र अनेकदा वरीष्ठ कार्यालय व ग्रा पं ने लेखी आदेश काढून ही आज पर्यंत येथील झालेले अतिक्रमण आज पर्यंत काढण्यात आले नाही ही जमीन शासनाची आहे तरी नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ चापोली यांनी संजीवनी महाविद्यालय चापोली च्या माध्यमातून यावर ग्रा पं चापोली व सर्व संबंधित यांना हाताशी धरून सर्वांना मॅनेज करून ग्रा पं व सर्व कार्यालयातील सकस आहार ची 1हेक्टर 40 आर जमीन व ग्रा पं ची 36 आर जमीन बाबतची पुरावे गायब करण्याचा प्रयत्न करून त्याबाबतचे खोटे दस्तावेज तयार करण्याचा पुरेपुर प्रयत्न केलेला दिसून येत आहे. ही जमीन ग्रा पं व शासनाची असल्याने संपूर्ण गावातील जनतेची आहे मात्र संजीवनी महाविद्यालय चापोली यांनी शासन व जनता यांची दिशाभूल करून आज पर्यंत ती हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत.
म्हणून ही चापोलीतील जनतेची जमीन त्यांना मिळवून देण्यासाठी या जमीनीवरील अतिक्रमण काढून शासनाच्या ताब्यात जमीन घेण्यात यावी जमीनीस रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा व संबधित दोषी यांचेवर कठोर दंडात्मक कारवाई करावी. अन्यथा दि 27/02/2023 पासून आपल्या कार्यालया समोर पक्षाच्या व संघटनेच्या वतीने बेमुदत अमरण उपोषण असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे असे निवेदन आज दि 13/02/2023 रोजी मा जिल्हाधिकारी यांची भेट घेवून प्रत्यक्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री मेघराज रामलिंग जेवळीकर यांच्या स्वाक्षऱीने कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत देण्यात आले योग्य ती कारवाई नाही केल्यास पुढील उद्भवणाऱ्या परिस्थितीस आपण व आपले प्रशासन जवाबदार राहील यांची गंभीर दखल घ्यावी असा इशारा ही देण्यात आला आहे.
आज पर्यंत अनेक निवेदन व तक्रारी देवून ही आज पर्यंत चापोली ता चाकूर जि लातूर येथील सर्वे नंबर 69 मधील सकस आहार जमीन बाबत काही ही कारवाई झालेली नाही त्यामुळे वरील निवेदन व आंदोलनाने ही जमीन शासन मोजमाप, पंचनामा व कठोर कारवाई करून शासनाच्या ताब्यात घेईल का या कडे सर्वसामान्य जनतेच्या नजरा लागल्या आहेत
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...