Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / मुंबईतील अंधेरी मरोळ...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

मुंबईतील अंधेरी मरोळ येथील 'अलजमीया - तुस - सफीया' या अरेबिक शैक्षणिक संस्थेचे उद्घाटन पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित*

मुंबईतील अंधेरी मरोळ येथील 'अलजमीया - तुस - सफीया' या अरेबिक शैक्षणिक संस्थेचे उद्घाटन पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले*    *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित*

*

 

जगदीश का. काशिकर

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

मुंबई: मुंबईतील अंधेरी मरोळ येथील 'अलजमीया - तुस - सफीया' या अरेबिक शैक्षणिक संस्थेचे उद्घाटन आज (शुक्रवार) पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.

 

देशातील युवा पिढीला पुढे नेणारी धोरणे शासनाकडून राबवली जात आहेत. कोणत्याही समाज घटकातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नये यासाठी शिक्षण धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला महत्व दिले जात आहे. 'दाउदी बोहरा' हा समाज आज काळाप्रमाणे बदलत असून नावीन्यपूर्ण शिक्षणाची वाट धरत आहे, ही गोष्ट आनंदाची आहे. अलजमीया - तूय- सफीयाह ही देशातील दुसरी अरेबिक शैक्षणिक संस्था असून या समाजाचे १५० वर्षांपूर्वीचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद वाटतो, असे मत याप्रसंगी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी बोलताना व्यक्त केले.

 

गुजरात सुरत येथील संस्थेचे माजी कुलपती डॉ.मोहम्मद बुरहानुद्दीन यांचे काम मी पाहिले आहे. नव्या पिढीला शिक्षण देण्यासाठी ते आग्रही होते. सुरत येथे त्यांनी कुपोषण आणि जलसाक्षरता साठी काम केले त्यांची सक्रियता ही ऊर्जा देणारी  होती. आजही या समाजाच्या आजच्या पिढीकडून आपल्याला प्रेम मिळत आहे. हे प्रेम खूप मोलाचे आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासमयी बोलताना सांगितले.

 

याप्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, "अलजमीया- तुस - सफीया चे  "कुलगुरू डॉ. सय्यदन मुफद्दल सैफउद्दीन, दाउदी बोहरा समाजाचे शहजादा अलिअसगर कलीमऊद्दीन, शहजादा कियदजोहर इज इज्जुद्दीन, दाउदी बोहरा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...