मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
उत्तम माने
मो.नंः 8484878818
निलंगा :- मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळणे आणि दुष्काळ निर्मूलन होणे हीच माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर यांना सर्वार्थाने आदरांजली ठरेल, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या या विधानाचा संदर्भ देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात मराठवाड्याला न्याय देऊ असे आश्वासित करीत ३५ हजार कोटींच्या निधी उपलब्ध करू असे सांगितले. दरम्यान, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी आठवणींना उजाळा देत महाराष्ट्राच्या जडणघडणीतील डॉ. निलंगेकर उपस्थितांना सांगितले.
माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निलंगा येथे स्मारक उभारण्यात आले आहे. त्याचे अनावरण माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यातील प्रमुख नेत्यांनी डॉ. निलंगेकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडला. सामान्य माणसांशी जोडलेली त्यांची घट्ट नाळ आणि पक्षनिष्ठेचा गौरव झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ. निलंगेकर यांच्या पत्नी सुशीलाबाई निलंगेकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खा. सुधाकर श्रृंगारे, माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे, आ. विक्रम काळे, आ. रमेश कराड, आ. सतीश चव्हाण, आ. अभिमन्यू पवार, माजी खा. रूपाताई पाटील निलंगेकर, माजी खा. डॉ. सुनील गायकवाड,काँग्रेसचे प्रदेश चिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, डॉ. शरद पाटील निलंगेकर, विजय पाटील निलंगेकर, डॉ. चंद्रकला डावळे, माजी आ. पाशा पटेल, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर,माजी आ. सुधाकर भालेराव, माजी आ. बाबूराव खंदाडे, माजी आ. मनोहर पटवारी, माजी आ. राम गुंडिले, माजी आ. गोविंद केंद्रे, माजी आ. धर्माजी सोनकवडे, माजी आ. त्र्यंबक भिसे, माजी जि. प. अध्यक्ष राहल केंद्रे आदि मंचावर उपस्थित होती..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी केले. सूत्रसंचालन शैलेश गोजमगुंडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. भागवत पौळ यांनी केले.
राज्याच्या राजकारणात निलंगेकर यांचे योगदान
डॉ. निलंगेकर हे मनमोकळे व्यक्तिमत्व होते. त्यांनी राज्य आणि देशाच्या विकासात योगदान दिले. काँग्रेसच्या अशा उत्तुंग नेतृत्वामुळे विकास गतिमान झाला, १४० कोटीच्या देशातही अन्नधान्य पुरवठा मुबलक होतो, ही काँग्रेसच्या धोरणांची परिणीती आहे. सिंचनाचा दृष्टिकोन डॉ. निलंगेकरांकडे होता.
-माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर ,
उच्च न्यायालयाचे खंडपीठ, सिंचन प्रकल्प.
माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या दूरदृष्टीने मराठवाड्यातील जनतेला न्याय मिळाला. औरंगाबादला उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन झाले.
मराठवाड्यात ठिकठिकाणी सिंचन प्रकल्प उभारले, अशा शब्दांत सोहळ्यास उपस्थित प्रमुख अतिथींनी डॉ. निलंगेकर यांच्या कार्याचा गौरव केला.
विकास कामांशी निष्ठा ठेवणारे नेतृत्व
सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका ठेवून डॉ. निलंगेकर यांनी विकासकामांशी निष्ठा ठेवली
-सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री
सिंचन प्रकल्प उभारले, माणसे जोडली
डॉ. निलंगेकर यांनी सिंचन प्रकल्पांबरोबरच माणसे जोडली. पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मराठवाड्याला पाणी मिळालेच पाहिजे, हे स्वप्न पाहिले. आता त्यांचे स्वप्न संभाजीराव यांच्या माध्यमातून फडणवीसांनी पूर्ण करावे. संभाजीरावानी गांधी टोपी आणि जॅकेट परिधान केले, याचा आम्हालाही आनंद आहे.
-जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष
येणाऱ्या पिढ्यांसाठी कायम मार्गदर्शक
डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे येणाऱ्या पिढ्यांसाठी कायम मार्गदर्शक व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व राहील. ते जिल्ह्यातील नेत्यांचे मार्गदर्शक होते. त्यांनी पक्षनिष्ठा जपली. जलसंधारण आणि उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे काम डॉ. निलंगेकरांचे स्मरण देत राहील.
- दिलीपराव देशमुख, माजी मंत्री
मुक्तिसंग्रामात योगदान
राजकारणातून समाजकारण डॉ. निलंगेकर यांनी केले. त्यांचे मराठवाड्याच्या मुक्तिसंग्राम लढ्यात मोठे योगदान होते. त्यांनी जिल्ह्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले.
-अशोकराव पाटील निलंगेकर, प्रदेश सरचिटणीस काँग्रेस,
जॅकेट अन् गांधी टोपी घालण्याचा आजीचा आग्रह
समारंभात येण्यापूर्वी आजीने मी आज आजोबांचे जॅकेट आणि गांधी टोपी घालावी, असा आग्रह केला. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर विकासाचे जॅकेट आणि गांधी टोपीचा वारसा पुढे घेऊन जाईन. लातूर जिल्हा निर्मिती, उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ आणि सिंचन प्रकल्पांचा विकास वारसा पुढे नेला जाईल.
- आ. संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...