*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड*
*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड* गडचिरोली मुनिश्वर...
Reg No. MH-36-0010493
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
*ग्राहक साक्षरता अभियान*
*प्रश्न :*'पोटखराब' क्षेत्र म्हणजे काय आणि त्याचे किती प्रकार आहेत?
*उत्तर:* 'पोटखराब' क्षेत्राबाबत कायदेशीर तरतुद "महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावरील निर्बंध) नियम १९६८, कलम २ अन्वये" आहे.
'पोटखराब' क्षेत्र म्हणजे खडकाळ, खंदक, खाणी, नाले, इत्यादीने व्याप्त असलेले क्षेत्र ज्यात पिक लागवड करता येणे शक्य होत नाही असे लागवडीयोग्य नसलेले क्षेत्र.
या 'पोटखराब' क्षेत्राचे "पोटखराब' वर्ग अ' आणि "पोटखराब' वर्ग व' असे दोन प्रकार आहेत.
• 'पोटखराब-वर्ग अ' म्हणजे खडकाळ क्षेत्र, नाले, खंदक, खाणी इत्यादीने व्याप्त असलेले क्षेत्र. वर्ग अ अंतर्गत येणाऱ्या पोटखराब क्षेत्रावर महसूलाची आकारणी करण्यात येत नाही. जरी अशी जमीन शेतकऱ्याने कोणत्याही लागवडीखाली आणली तरीही अशी जमीन आकारणीस पात्र असणार नाही. 'पोटखराब- वर्ग अ' प्रकाराखाली येणाऱ्या क्षेत्राची आकारणी करायची असेल तेव्हा त्याबाबतचा प्रस्ताव तहसिलदारांमार्फत मा. जमाबंदी आयुक्त यांना सादर करून आदेश प्राप्त करावा लागतो. अशा आदेशानंतरच 'पोटखराब-वर्ग अ' प्रकाराखाली येणाऱ्या क्षेत्रावर आकारणी करता येते. तथापि, 'पोटखराब-वर्ग अ' क्षेत्राखाली येणाऱ्या जमिनीत जर शेतकऱ्याने काही पीके घेतली असतील तर पीक पाहणीच्या वेळेस अशा पीकांची नोंद घेता येते.
• 'पोटखराब वर्ग ब' म्हणजे रस्ते, पदपथ किंवा जलप्रवाह, कालवे, तलाव अशा सार्वजनिक प्रयोजनार्थ किंवा घरगुती प्रयोजनासाठी वापरणेत येणारे तलाव किंवा ओढा यांनी व्यापलेली किंवा कोणत्याही जाती-जमाती मार्फत दहनभूमी किंवा दफनभूमी म्हणून वापरात असणारी किंवा पाण्याची टाकी, रहिवास वापर अशा काही विशिष्ठ प्रयोजनार्थ राखून ठेवलेली, आणि त्यामुळे लागवडीसाठी उपलब्ध नसलेले क्षेत्र. 'पोट खराब' वर्ग 'ब' क्षेत्रावर लागवड करण्यास 'महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावरील निर्बंध) नियम १९६८ कलम २ (३) च्य' उपबंधानूसार म.ज.म.अ. १९६६, कलम ४३ अन्वये प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
'पोटखराब वर्ग ब' क्षेत्रावर कोणत्याही प्रकारची महसूल आकारणी करण्यात येत नाही. 'पोटखराब 'वर्ग अ' आणि 'वर्ग व' याची क्षेत्र पडताळणी जिल्हा भूमापन कार्यालयातील माहीतीशी तसेच उपलब्ध अभिलेखातील लागवडीयोग्य नसलेल्या (गाव नमुना एकचा गोषवारा) क्षेत्राशी करावी. पोटखराब 'वर्ग अ' आणि 'वर्ग व' चे क्षेत्र स्वतंत्रपणे लिहून त्याखाली एकूण पोटखराब क्षेत्र लिहीले जाते.
लेखक - डॉ. संजय कुंडेटकर, (उपजिल्हाधिकारी, महाराष्ट्र शासन)
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर (रिअल इस्टेट कन्सलटन्सट), कोल्हापूर.
मोबाईल: 7350201000, 8459348218.
*जमिनीच्या वादाची कारणे:- कायदा नियमांचे अज्ञान, सामाजिक प्रतिष्ठा, इर्षा, महत्वाकांक्षा, व्देष, यांमुळे होणारी अडवणूक व बेकायदेशीर कामे, जनता व प्रशासनात सुसंवादाचा अभाव, योग्य सल्ल्याचा अभाव, अचूक कार्यपद्धतीची माहिती नसणे, सातबारा पुर्नलेखनामध्ये झालेल्या चुका, सातबारा संगणकीकरणामध्ये झालेल्या चुका, कुटुंबांतर्गत वाद इत्यादी.*
*विशेष निवेदन* - 140 कोटी भारतीयांचा सुखाचा जीवन कल्याणाचा मार्ग सांगणारे तसेच , शासन कारभारात पारदर्शकता आणि लोकसहभाग वाढवणे गरजेचे आहे म्हणून आपण आपल्या संग्रही *संविधान ग्रंथ* व *माहिती अधिकार अधिनियम 2005 असणे आवश्यकच आहे.*
सहकारी संस्थेचा सहकार कायदा (सोसायटी) व ओनरशिप कायदा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी श्री जगदीश काशीकर यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” (https://www.facebook.com/groups/485736278978687/) / (http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/) हा फेसबुक ग्रुप/पेज त्यांनी जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा व हा ग्रूप/पेज पसंद करुन त्यात सामिल व्हावे ही मनापासुन विनंती करत आहेत.
ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली चार ते पाच वर्ष तनावात असलेल्या मुंबईतील अंधेरी - पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीवर दिड वर्षभरापुर्वि प्रशासक (अेडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी (देखभाल खर्च दर महिन्याला पाच हजार आकारूण) आपल्या ताब्यात घेतली होती व येणारया काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी/माजी साेसायटी अध्यक्श, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर/सभासदांवर तसेच ज्यांनीं गेर व्यवहार करुन आपल्या सदनिका विकत घेतल्या किंवा विकल्या व आपल्या सदनिकेचे नुतनिकरण करताना संरचनेत बदल केला आहे किंवा ईतर गेरव्यवहार केला आहे त्या आजि व माजि राजकिय पाठिंबा व आर्थिक सुबत्ता असलेले सुशिक्क्षित गुंड प्रवृत्तिच्या गुन्हेगार सभासदांवर याेग्य ती कारवाई करून (अहवाल सादर करुन किंवा योग्य त्या शासन यंत्रणेकडुन पुढील कारवाई करून) सोसायटी पुन्हा भविष्यात नवीन कमिटी स्थापुन नवीन सोसायटी कमिटी/सभासदांकडुन कोमल रहिवाशी सोसायटी व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे तसेच या विभागातील सर्व राजकिय पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच ईतर सामाजिक कार्यकर्ते रहिवाशी सोसायटीला कोणताहि आपला स्वार्थ्य न साधता कसे सहकार्य सोसायटीतील योग्य रहिवाश्यांना ही गंभीर समस्या सोडविण्यास मदत करणार आहेत हे मुबंई महानगर पालिकेच्या येणारया निवडणूका निमित्ताने सर्व विभागातील जनतेला/नागरिकांना दिसणार आहे व मुंबईकर जनतेने या घटनेवर योग्य पध्दति ने लक्ष ठेऊन येणारया सर्व निवडणूका मध्ये योग्य ऊमेदवारांना कोणताहि राजकिय पक्ष न बघता निवडुन देणे जनसामान्यांच्या हितासाठि तसेच या देशातील भारतीय जनतेसाठी फार महत्त्वाचे आहे.
अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील प्रमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.
या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.
सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती.
*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड* गडचिरोली मुनिश्वर...
वणी:: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे...
वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...
वणी - एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. या कंपनीत काम करणा-या 65 कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले...
वणी:१०४ सुवर्ण पदक स्केटिंगमध्ये पटकावणारी बोटोणी येथील मनस्वी पिंपरे ही गुरुवारी (दि. 23) बोटोणी ते वणी 30 किमी. अंतर...
वणी : वणी शहरात सौंदर्याकरण साई मंदिर ते टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात करण्यात आले. यामध्ये मध्यभागी...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...