Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / गौतम अदानी: किंग ऑफ ...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

गौतम अदानी: किंग ऑफ फ्रॉड

गौतम अदानी: किंग ऑफ फ्रॉड

 

 

स्प्राऊट्स Exclusive

 

तुमच्याकडे असणाऱ्या मालमत्ता, संपत्तीपेक्षा जगातील कोणतीही बँक तुम्हाला अधिक कर्ज देत नाही, हा साधासरळ जागतिक नियम आहे. मात्र उद्योगपती गौतम अदानी यांना बँकांनी तारण ठेवलेल्या मालमत्तेपेक्षा कैक पटीने अधिक कर्ज दिलेले होते. हे सर्व कर्ज, गुंतवणूक ही एसबीआय, एलआयसी यांच्यासारख्या सरकारी बँक व संस्थांनी दिलेली होती.

 

अदानी यांचा धंदा जरी मोठा असला तरी तो टाटा (Tata), बिर्ला यांच्यासारखा परंपरागत नव्हता. तो नुकताच उभारलेला होता. अगदी २०१४ च्या निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान पदाचे दावेदार असलेले उमेदवार व सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानी यांच्याच विमानाने भाजपचा निवडणूक प्रचार करीत होते. त्या विमानांवरही अदानी ग्रुपचा लोगो व नाव असे. मात्र त्यांच्या या मोदींवरील गुंतवणुकीचा फायदा त्यांना मोठ्या प्रमाणावर झाला. या निवडणुकीतील विजयानंतर अदानी यांनीही यांच्या बिझनेसनेही गगनभरारी घेतली.

 

निवडणुकीमध्ये भ्रष्ट उद्योगपतींची आर्थिक मदत घेणे, ही परंपरा भारतात दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी हेही त्यावेळी बिर्ला (Birla) सारख्या उद्योगपतींची मदत घ्यायचे, मात्र त्याचा मोदी यांच्याइतका अतिरेक नसे. आज मोदी यांच्या हव्यासापोटी भारताची अर्थव्यवस्थाच खिळखिळी होवू लागलेली आहे.

 

मोदी यांच्या इशाऱ्यावर सेबीचे (SEBI ) अधिकारीही डोलू लागलेले होते. अदानी हे बुडते जहाज आहे, असे या अधिकाऱ्यांना माहित असतानादेखील सेबीने (Securities and Exchange Board of India) अदानी यांना आयपीओ  त्यानंतर एफपीओ काढायला परवानगी दिलेली आहे. एखादी कंपनी तोट्यात चालण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, हे जगजाहीर होते.

 

सेबीच्या अधिकाऱ्यांना तर हे चांगलेच ठाऊक होते, अशा परिस्थितीत सेबीने या आयपीओ, एफपीओ काढायला बंदी घालायला होती, मात्र लाचखोर सेबी अधिकाऱ्यांनी अदानी यांच्याशी आर्थिक संधान बांधलेले होते. त्यामुळेच महाभ्रष्ट सेबीने अदानी यांच्या भ्रष्ट मार्गाला साथ दिली. अर्थात त्यामुळे लाखो गुंतवणूकदाराचे नुकसान झाले आणि भारताच्या अर्थव्यवस्थेलाच तडे गेले.

 

अदानी त्यांच्यासारखीच पेटीएम (Paytm) नावाची कंपनी होती. ही कंपनी तोट्यात चालणारी होती, त्यामुळे खरेतर सेबीने पेटीएमच्या आयपीओला परवानगी नाकारायला हवी होती. मात्र सेबीच्या अधिकाऱ्यांनी पेटीएमचे अधिकारी विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांच्याशी आर्थिक हातमिळवणी केलेली होती. त्यामुळे लाखो ग्राहकांची फसवणूक झालेली होती, हा देशातील मोठा आर्थिक महाघोटाळा आहे, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्प्राउट्स एसआयटीने त्यावेळी केलेली होती.  

 

इतकेच नव्हे तर सेबीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पितळ उघडे करणारे दोन स्पेशल रिपोर्टही १९ नोव्हेंबर व २० नोव्हेंबर २०२१ या 'स्प्राऊट्स'च्या अंकात प्रसिद्ध केलेले होते. Untrustworthy SEBI, gives Paytm free hand व multy crore scam in Paytm हे रिपोर्ट्स स्प्राऊट्सच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. मात्र दुर्दैवाने हा महाघोटाळाही दाबण्यात आला. आजही हेच सेबीचे अधिकारी मोकाट फिरत आहेत, आणि अदानी नावाच्या भामट्याला छुपी साथ देत आहेत.

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

सहकार्य:*उन्मेष गुजराथी*

*स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी*

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...