मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
निलंगा,दि.३१
निलंगा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेशिस्त,बेजवाबदार निकृष्ट दर्जाचे कामकाज व प्रधानमंत्री पीकविमा २०२२ चा राहिलेली विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निलंगा ते उमरगा (हा) रस्ता दुरुस्तीचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम उत्कृष्ट दर्जाचे करण्यात यावे या व विविध मागण्यांसाठी निलंगा तालुक्यातील उमरगा हाडगा येथील ६८ वर्षीय सामाजिक कार्यकर्ता येथील उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले आहेत
याबाबत अधिक माहिती अशी की, सामाजिक कार्यकर्ते चंद्रप्रकाश देवबा सुरवसे हे मागील अनेक वर्षांपासून अनेक सामाजिक विषयावर काम करीत असून त्यांनी आतापर्यंत अनेक विषयासाठी निवेदने तक्रारी आमरण उपोषण करून विषय मार्गी लावून न्याय मिळवून दिला आहे.
मात्र निलंगा शहरापासून अगदी ०५ किमी अंतरावर असलेले मौजे उमरगा (हा)ता.निलंगा जिल्हा लातुर हे त्यांचे मूळ गाव या गावावरून निलंगा जाण्यासाठीच्या रोड दुरुस्ती चे काम चालू झाले खरे परंतु सदरील काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून हाताने खडी उखडली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्या संदर्भात त्यांनी सदरील गुत्तेदारास विचारणा केली असता आमचे तीन तीन वर्षे बिल निघत नाहीत आमचा घाटा होतो म्हणून काम निकृष्ट होत आहे .म्हणून दिनांक ११ नोव्हेंबर २०२२रोजी रोडचे काम निकृष्ट करण्यात येत आहे यासाठी कार्यकारी अभियंता सा.बा विभाग निलंगा यांना निवेदनाद्वारे आमरण उपोषण करण्याबाबत लेखी कळवले होते.
मात्र त्यांच्या या निवेदनाला कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग निलंगा यांनी केराची टोपली दाखवली होती.
म्हणून त्यांनी या विषयाला अनुसरून दि.०९ जाने २०२३ रोजी आमरण उपोषणाची पुन्हा लेखी कळवून न्याय मागितला होता.परंतु त्यांना अद्यापही काही लेखी कळवले नसल्याने दि .३०जाने २०२३ रोजी पासून उपविभागीय कार्यालय निलंगा यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...