वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
*
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
संभाजी नगर: ५६ वा निरंकारी वार्षिक संत समागम सोहळा यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून निरांकारी माता सुदीक्षाजी महाराज आणि राजपिता रमित चांदनाजी यांचे शुभाशीर्वाद घेतले तसेच मोठ्या संख्येने जमलेल्या साधकांशी संवाद साधला.
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून समाजाला दिशा देण्याचे काम संत करत असतात. मानवजातीच्या कल्याणासाठी ते सतत कार्यरत असतात. निरंकारी मंडळातील साधक देखील आपल्या गुरूंच्या शिकवणीनुसार निस्वार्थीपणे अखंड सेवाभाव जपण्याचा प्रयत्न करतात असे गौरवोद्गार यासमयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
कोरोना कालखंडात निरंकारी मंडळाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी कोरोना केंद्र उभारण्यात आली. महाड चिपळूण येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूराच्या वेळीही मला निरंकारी मिशनचे कार्यकर्ते मंडळी अखंड सेवा करताना दिसले. माझ्या ठाणे मतदारसंघात देखील निरंकारी मिशनचे साधक अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबवताना दिसतात त्यातही मी कायम सहभागी होत असतो असेही यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच २६ जानेवारी रोजी अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली त्याबद्दलही निरांकरी मिशनचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.
याप्रसंगी संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगेंद्रसिंह जुनेजा, संत निरंकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि देश प्रदेशातून आलेले ३ लाखांहून अधिक साधक उपस्थित होते.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...