Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / धारावी पुनर्विकासाचे...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

धारावी पुनर्विकासाचे काम अदानींकडून काढून घेण्याची मागणी*

धारावी पुनर्विकासाचे काम अदानींकडून काढून घेण्याची मागणी*

*

 

स्प्राऊट्स Exclusive

 

अदानी यांची आर्थिक पात्रता नसल्यामुळे त्यांच्याकडून 'धारावी'च्या झोपडपट्टी पुनर्विकासाचे कंत्राट कडून घेण्यात यावे, अशी मागणी 'स्प्राऊट्स'च्या टीमच्या वतीने केली जाणार आहे. या मागणीसाठी 'स्प्राऊट्स'च्या वतीने लवकरच मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात येणार आहे. या याचिकेत राज्य सरकारलाही पार्टी बनविण्यात येणार आहे.

 

जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर अमेरिकेतील आर्थिक संशोधन करणाऱ्या विश्वासार्ह कंपनीने गंभीर आरोप केलेले आहे. या अहवालावरून लवकरच ही कंपनी डबघाईला येणार हे सिद्ध होत आहे. अशा परिस्थितीत अदानी ग्रुप (Adani Group) हा धारावीच्या पुनर्विकास करण्यासाठी पात्र नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे येथील स्थानिक लाखो कुटुंबियांच्या हितासाठी हे कंत्राट अदानी समूहाकडून त्वरित काढून आवश्यक आहे. अदानी ऐवजी टाटा (Tata Group) सारख्या विश्वासार्ह कंपनीकडे ही जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी मागणीही 'स्प्राऊट्स'च्या वतीने करण्यात येणार आहे.

 

*काय आहे प्रकरण?*

 

धारावी (Dharavi) ही भारतातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीत ६० हजारांहून अधिक झोपड्या आहेत. येथील लोकसंख्या ही १० लाखांहून अधिक आहे. या झोपडपट्टीचा पुनर्विकास (redevelopment) हा मागील १८ वर्षांपासून रखडलेला होता. त्याला चालना देण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पाने (डीआरपी ) निविदा मागविल्या होत्या. यात 'डिएलफ' (DLF) समुहाने २०२५ कोटी रुपयांची बोली लावलेली होती. मात्र ही या समूहाची ही निविदा अपात्र ठरविण्यात आलेली होती. व अखेरीस कमी किंमतीची बोली लावणाऱ्या अदानी समूहाने ही बोली जिंकली व त्यांना पुनर्विकासाचे कंत्राट देण्यात आले.

 

हे कंत्राट राज्य सरकारच्या अखत्यारीत होते. मात्र हे काम अदानी यांनाच मिळावे, असा आदेश दस्तरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीच दिलेला होता, हे जगजाहीर आहे. निविदा काढणे, बोली लावणे हा केवळ एक फार्स होता. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeary ), मनसेचे (MNS) सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray ) यांचेही अदानी प्रेम दिसून आले. त्यामुळे हे कंत्राट मिळवण्यात अदानी यशस्वी झाले.

 

*'स्प्राऊट्स'नेही दिला होता इशारा:*

 

३१ ऑक्टोबर २०२१ रोजी 'स्प्राऊट्स' (Sprouts) या मुंबईतील विश्वासार्ह इंग्रजी दैनिकात अदानी उद्योग समूहाविषयी स्पेशल रिपोर्ट ( ADANI'S FINANCIAL MISADVENTURE, Adani to fall back upon NaMo) प्रसिद्ध करण्यात आला. अदानी यांनी एसबीआय बँक (SBI Bank), एलआयसी (LIC) यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील सामान्य जनतेच्या पैशावर कसा डल्ला मारला व त्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने कायदे कसे वाकविले, याचा साधार वृत्तांत सादर केलेला होता, मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.

 

जगदीश का. काशिकर

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

सहकार्य:*उन्मेष गुजराथी*

*स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी*

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...