वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
*
जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: सकाळ माध्यम समूहाच्या ५२ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या समृद्ध महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित सकाळ सन्मान पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून पुरस्कारप्राप्त प्रभृतींना सन्मानित केले.
याप्रसंगी दैनिक सकाळ वृत्तपत्राचे संपादक राहुल गडपाले यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गेल्या सहा महिन्यात घेतलेल्या निर्णयांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच उद्योग, पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, जलसंधारण, ऊर्जा, पर्यावरण रक्षण यांसारख्या महत्वपूर्ण क्षेत्रात सुरू असलेल्या कामांची महिती दिली. हे सरकार सर्वसामान्य व्यक्तींना न्याय देणारे सरकार असून त्यांना केंद्रबिंदू मानून कार्यरत असल्याचे यासमयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधोरेखित केले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, शिवडी न्हावाशेवा सी लिंक, कोस्टल हायवे, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक, वर्सोवा ते विरार सागरी मार्ग, कोकणातील नव्याने प्रस्तावित असलेला कोस्टल हायवे अशा अनेक पायाभूत सुविधांची यावेळी माहिती दिली. तसेच मुंबईतील प्रस्तावित सुशोभीकरण आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मेट्रो मार्ग यांनी सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याचे देखील नमूद केले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे नव्याने तयार झालेल्या मेट्रो मार्ग २ अ आणि मेट्रो मार्ग ७ वरून १८ दिवसांत १० लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती दिली.
यासमयी मनोरंजन, प्रशासकीय सेवा, वाचन चळवळ, सामाजिक कार्य, उद्योजक, पर्यावरण, परिवहन सेवा, जनजागृती, कृषी, परिवहन सेवा तसेच एमएमआर क्षेत्रातील सर्व प्रमुख महानगरपालिकांना देखील सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी सकाळ माध्यम समूहाचे संचालक प्रतापराव पवार, सकाळचे संपादक राहुल गडपाले, सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, सकाळ सन्मान सोहळ्यासाठी आलेले सर्व कलाकार, सकाळ माध्यम समूहात विविध विभागात काम करणारे सर्व कर्मचारी, पत्रकार आणि रसिक प्रेक्षक उपस्थित होते.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...