छञपती शिवाजी महाराज चौकातील देशी दारू दुकान कायमचे बंद करा..
छञपती शिवाजी महाराज चौकातील देशी दारू दुकान कायमचे बंद करा लहूजी शक्ती सेनेची उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांना केली निवेदनाद्वारे मागणी....
✍️उतम माने
लातूर
लातूर/ निलंगा : - निलंगा शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात देशी दारू विक्रीचे परवाना धारक देशी दारूचे दुकान असून गेल्या अनेक वर्षापासून सदरील दारू दुकान हटवावे अशी मागणी होत असताना देखील राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने सदरील दारू दुकान हे चालू असून यावर कोणाचा अंकुश राहिला नाही.तसेच मुख्य चौकात असल्याने तळीराम दारू पिवून रस्त्यावरच आपले बस्तान मांडल्याने याचा ञास रस्त्यावर येजा करणाऱ्या महिलांना याचा नाहक ञास सहन करावा लागत आहे.तसेच सदरील देशी दारू दुकानजवळ छञपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, मंदिरे,इंग्लिश स्कुल,भाजी मार्केट,आश्रम शाळा आहेत.महिला विद्यार्थी विद्यार्थ्रीनी लहान मुले मुली याना तळीरामाचा ञास होत आहे.तसेच तळीराम दारू पिऊन रस्त्यावर पडून आर्वाच भाषेत शिव्या घालत असल्याने महिला लहान मुले यांना तळीरामाच्या ञासाला सामोरे जावे लागत असून शहरातील नागरिक वैतागून गेले आहेत.
सदरील देशी दारू दुकान दहा ते बारा वर्षापासून छञपती शिवाजी महाराज चौकात चालविले जात आहे मागील काळात शहरातील सामाजिक संघटनानी तक्रारी अर्ज करून हे दुकान शहराबाहेर उचलावे असे निवेदन प्रशासनास दाले असता संबंधित दुकान मालक यानी एक वर्षे बंद ठेवले होते.परंतु शहरातील काही राजकीय पुढाऱ्यांनी आपली पोळी भाजून घेण्यासाठी सदरील दुकान चालू करण्यास नाहरकत देताच पुन्हा हे दारू दुकान सुरू झाले आहे.काही सामाजिक संघटनेच्या पुढाऱ्यांना आर्थिक देवाणघेवाण करून पुन्हा हे दारू दुकान सुरू असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.लहूजी शक्ती सेनेचे मराठवाडा कार्यध्यक्ष गोविंद सुर्यवंशी व पञकार उत्तम माने यानी राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस याना तक्रारी अर्ज देऊन सदरील देशी दारू दुकान कायमचे बंद करावे अशी मागणी केली आहे.आठ दिवसात संबंधित दारू दुकान चालकाने हे दुकान बंद नाही केले तर मंञालयासमोरच अमरन उपोषण करणार असल्याचे गोविंद सुर्यवंशी व पञकार उत्तम माने यानी सांगितले आहे.राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस यानी तात्काळ लक्ष घालून हे दारू दुकान बंद करावे अशी मागणी शहरातील जानकार नागरिकातून होत आहे.