Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / मुंबई बँकेतील संचालकांच्या...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

मुंबई बँकेतील संचालकांच्या कथित बेनामी संपत्तीच्या चौकशीची मागणी*

मुंबई बँकेतील संचालकांच्या कथित बेनामी संपत्तीच्या चौकशीची मागणी*

*

 

स्प्राऊट्स Exclusive

 

मुंबै बँकेच्या २१ संचालकांची संपत्ती ही कोट्यवधी रुपयांची आहे. या संचालकांनी बँकेच्या पहिल्या निवडणुकीच्या वेळी असणारी संपत्ती व आताची संपत्ती यात कित्येक पटीने अधिक वाढ झालेली आहे, या सर्व प्रकरणाची त्वरित चौकशी करण्यात यावी, अशी मागणी 'स्प्राऊट्स'च्या टीमने केलेली आहे.

 

काही अपवाद वगळता इतर सर्व संचालकांचा कोणताही ठोस उत्पन्नाचा स्रोत नसताना त्यांनी या बँकेत कोट्यवधी रुपयांचा कथितरित्या भ्रष्टाचार केलेला आहे. यामध्ये जगातील श्रीमंत मजूर म्हणून मानले जाणारे प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांचाही विशेष सहभाग आहे. भ्रष्टाचार करण्यात ते 'प्रवीण' आहेत. प्रसाद लाड (Prasad Lad) हेही या बँकेवर संचालक आहेत.

 

हे सर्व महाभ्रष्ट आहेत. या सर्व २१ संचालकांची आयकर विभागाने (income tax) त्वरित चौकशी करावी, अशी विनंती 'स्प्राऊट्स'च्या वतीने करण्यात येणार आहे. स्प्राऊट्सच्या या मागणीला आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) प्रवक्ते धनंजय शिंदे (Dhananjay Shinde) यांनीही दुजोरा दिलेला आहे.

 

यासंबंधी लवकरच ईडीकडे तक्रार करण्यात येणार आहे, असेही शिंदे यांनी 'स्प्राऊट्स'शी बोलताना सांगितले.

 

प्रवीण दरेकर, प्रसाद लाड या संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने (EOW ) नुकतीच क्लीन चिट दिलेली आहे. ही क्लीन चिट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis ) यांच्या इशाऱ्यावरून झालेली आहे, हे जगजाहीर आहे. मात्र त्याची उच्च न्यायालयामार्फत चौकशी होणे आवश्यक आहे. या सर्व भ्रष्टाचाऱ्यांना उच्च न्यायालय व देवाच्या अंतिम न्यायालयात कधीही क्षमा नाही, याचे त्यांनी भान राखावे.

 

प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर यांची संचालकपदी झालेली नेमणूक ही बेकायदेशीररितीने झालेली आहे. या बेकायदेशीर निवडणुकीला लवकरच मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. या बँकेचा  वकील अखिलेश मायशंकर चौबे हा तर टॅक्सचोर आहे. त्याने दरेकर यांचे तळवे चाटत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता गोळा केली आहे. यासंबंधीच्या बातम्या स्प्राऊट्सने (Sprouts) प्रसिद्ध केलेल्या आहेत.

 

घोटाळेबाज बँक, जगातील 'श्रीमंत मजूर' व टॅक्सचोर वकिलाची 'स्प्राऊट्स'ला पुन्हा नोटीस

 

'स्प्राऊट्स'च्या या बातम्यांमुळे प्रवीण दरेकर व त्यांचे बगलबच्चे खवळून उठले. यासंबंधी स्प्राऊट्सच्या संपादकांना आतापर्यंत दरेकर, बँक व टॅक्सचोर वकील चौबे यांनी पुन्हा नोटीस पाठविल्या आहेत. हा तर कायदेशीरपणे मानसिक खच्चीकरण करण्याचे षडयंत्र आहे. मात्र कितीही दबाव टाकला तरी माफी मागायला, अग्रलेख मागे घ्यायला, 'स्प्राऊट्स'चे संपादक म्हणजे 'लोकसत्ता'चे (Loksatta) गिरीश कुबेर (Girish Kuber) नाहीत, हे संबंधितांनी लक्षात ठेवावे.

 

*चाळीतले टॉवरमध्ये*

 

काही संचालकांचा अपवाद वगळता बहुतांशी संचालक हे सुरुवातीच्या काळात चाळीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. आज हेच संचालक या बँकेतील सभासदांच्या जीवावर टॉवरमधील ४ बीएचकेच्या फ्लॅटमध्ये राहत आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.

 

वाचकांच्या बळावर 'स्प्राऊट्स' या विश्वसनीय इंग्रजी वृत्तपत्राची घोडदौड चालू आहे, याचा आम्हाला आभिमान आहे, हे अत्यंत विनम्रपणे सांगावेसे वाटते.

 

जगदीश का. काशिकर

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

सहकार्य:*उन्मेष गुजराथी*

*स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी*

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...