Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / ७४ व्या प्रजासत्ताक...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितित त्यांनी या निमित्त राज्यातील जनतेला संबोधित केले*

७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले*    *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितित त्यांनी या निमित्त राज्यातील जनतेला संबोधित केले*

**मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितित त्यांनी या निमित्त राज्यातील जनतेला संबोधित केले*

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

मुंबई: ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले.

 

राज्यातील युती सरकारने गेल्या सहा महिन्यात केलेल्या कामाचा लेखाजोखा आपल्या भाषणातून त्यांनी  मांडला. यात प्रामुख्याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, नव्याने कार्यान्वित झालेले मेट्रो मार्ग, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तयार होत असलेली मिसिंग लिंक, कोकण ग्रीनफिल्ड हायवे, कोस्टल रोड या सगळ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची प्रगती त्यांनी मांडली. राज्याने स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाची केलेली निर्मिती, ५ ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्थेत १ ट्रीलियन अर्थव्यवस्था साध्य करण्यासाठी दाओस येथे करण्यात आलेल्या १ लाख ३७ हजार कोटी रुपयांचे करार हे या दृष्टीने टाकलेलं सकारात्मक पाऊल असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

 

कृषी,उद्योग,आरोग्य, जलयुक्त शिवार, २६३ सौर निर्मिती प्रकल्प ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासासाठी दिलेली सवलतीचा ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेला फायदा याबाबत त्यांनी आपल्या भाषणातून आढावा घेतला.

 

यासमयी भारतीय नौदल, पोलीस दल, अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिकेचे सुरक्षा दल, दंगलविरोधी पथक, रेल्वे पोलीस दल, गृहरक्षक दल, वाहतूक पोलीस दल, मुंबई पोलिसांचे निर्भया पथक, गडचिरोली सी-६० कमांडो पथक, सुरक्षारक्षक मंडळ यांनी यावेळी झालेल्या संचलनात सहभाग घेतला. त्यासोबतच राज्य प्रशासनातील शालेय शिक्षण क्रीडा विभाग, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य, गृहनिर्माण विभाग, वाहतूक नियंत्रण शाखा, सामजिक न्याय सामान्य प्रशासन, वन विभाग, कामगार विभाग, ऊर्जा विभाग, नगरविकास विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे विविध विषयावरील आकर्षक चित्ररथ या संचलनात सहभागी झाले होते.

 

याप्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच राज्य प्रशासनातील सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...