Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / *सायबर गुन्हेगारांकडून...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

*सायबर गुन्हेगारांकडून के. वाय. सी. फॉडचा नविन सापळा - ॲड. चैतन्य भंडारी*

*सायबर गुन्हेगारांकडून के. वाय. सी. फॉडचा नविन सापळा - ॲड. चैतन्य भंडारी*

 

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

धुळे - नागरीकांना अमुक तमुक बँकेकडून केवायसी अपडेट केले नाही या संदर्भात मॅसेज येतात, ते लगेच करा अन्यथा तुमचे अकाउंट ब्लॉक करण्यात येईल असे सांगून एक लिंक दिली जाते. त्या लिंकवर क्लिक केल्यावर ते पुढे जसे जसे सूचना करत जातात त्या सूचना नागरीक पाळत जातात, त्यात तुमचा अकाउंट नंबरपासून तर आधार कार्ड नंबर पर्यंत सगळ्या गोष्टी विचारुन घेतल्या जातात आणि मग सांगतात की आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो आम्हाला कळवा मग तुमचे प्रोसेस पुर्ण होवून तुमचे केवायसी अपडेट होईल. तुम्ही त्याप्रमाणे ओटीपी आल्यावर तो ओटीपी तुम्ही लगेच त्या अज्ञात व्यक्तीला देतात अन् क्षणार्धात तुमचे बँक अकाउंट खाली होते. मुळात कोणतीही बँक असे केवायसी ऑनलाईन अपडेट करायला सांगत नाही, केवायसी अपडेट करण्यासाठी तुम्हाला त्या बँकेत जावे लागते हे नागरीकांनी कायम लक्षात ठेवावे आणि हे जर लक्षात ठेवले तर आपली होणारी फसवणूक टाळता येईल. तसेच असे फसवणुकीचे फॉड मॅसेजेस नीट बारकाईने वाच जा हमखास तिथे एखादी काहीतरी गडबड सहज कळू शकते. सायबर फ्रॉडच्या आजवर इतक्या केसेस पाहिल्या त्या सर्वांमध्ये एक कॉमन धागा आहे तो म्हणजे 'बेसावध क्षण'. मग तो हॅकर्सकडून आलेला कॉल असेल किंवा आलेला मॅसेज असेल. हमखास आपल्यापैकी अनेक जण त्या क्षणी हिप्नोटाईज झाल्यासारखे होतात आणि अन घोळ होतो आणि मग नंतर जेव्हा कळत तेव्हा खूप उशिर झालेला असतो. म्हणून अशा फसव्या मॅसेजपासून नागरीकांनी सावध रहावे व अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याअगोदर नागरीकांनी विचार करावा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी व सायबर अॅवरनेस फाउंडेशनचे सदस्य श्री. धनंजय देशपांडे, पुणे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...